Kane Williamson Shared Injury Updates: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिहॅब प्रक्रियेतून जाणार आहे. विल्यमसनला या वर्षी भारतात खेळल्या जाणार्‍या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये पुनरागमन करण्याची आशा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आता खुद्द फलंदाजाने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.

आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग असलेला केन विल्यमसन या स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (ब्लॅककॅप्स) एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विल्यमसन त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देत आहे. तसेच व्हिडीओमध्ये विल्यमसन जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले

व्हिडीओमध्ये बोलताना तो म्हणाला, “मी आठवडा दर आठवडा माझ्या परिस्थितीचे निरीक्षण करत आहे. मला यापूर्वी जास्त दिवसासाठी दुखापत झाली नव्हती, पण इतर लोकांच्या बाबतीत असे घडले आहे. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की प्रवास जरा लांबचा आहे. त्यामुळे जर तुम्ही खूप पुढे पाहिले तर ते कदाचित थोडे आव्हानात्मक असू शकते.”

हेही वाचा – ZIM vs USA: झिम्बाब्वेने रचला इतिहास! एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

विल्यमसनवर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती, ज्यातून तो बरा होत आहे. विल्यमसन विश्वचषकात न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा फलंदाज ठरू शकतो. विल्यमसनच्या शानदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २०१५ आणि २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु दुर्दैवाने संघाला दोन्ही वेळा ट्रॉफी जिंकता आली नाही.

मायकल ब्रेसवेलही आहे बाहेर –

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल पायाच्या दुखापतीमुळे भारतात होणाऱ्या या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि प्रभावीपणे फलंदाजी करण्यास सक्षम ब्रेसवेल ९ जून रोजी इंग्लिश टी-२० ब्लास्टमध्ये वूस्टरशायरकडून खेळला होता. त्याच्या उजव्या पायात अकिलीस टेंडनच्या दुखापतीमुळे तो सहा ते आठ महिन्यांसाठी बाहेर आहे.

विल्यमसनची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

केन विल्यमसनने आतापर्यंत ९४ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या १६४ डावांमध्ये त्याने ५४.८९ च्या सरासरीने ८१२४ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.८५ च्या सरासरीने ६५५५ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३३.३ च्या सरासरीने आणि १२२.८९ च्या स्ट्राइक रेटने २४६४ धावा केल्या आहेत.