ऑस्ट्रेलियावर कसोटी आणि वन-डे मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर आता आव्हान असणार आहे ते केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाचं. 23 जानेवारीपासून दोन्ही देशांमध्ये 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ शनिवारी ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. ऑकलंड विमानतळावर दाखल होताच, उपस्थित भारतीय चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात भारतीय संघाचं स्वागत केलं. या दौऱ्यात भारतीय संघ 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.

Story img Loader