New Zealand vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Live Match Updates in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १६व्या सामन्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्रथम फलंदाजी करायला आलेल्या न्यूझीलंड संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून २८८ धावा केल्या. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघासमोर २८९ धावांचे लक्ष्य ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ६ गडी गमावून २८८ धावा केल्या. चेन्नईच्या खेळपट्टीवर ही चांगली धावसंख्या असून ती गाठणे अफगाणिस्तानसाठी सोपे नसेल. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार टॉम लॅथमने ६८ धावांची खेळी केली. सलामीवीर विल यंग ५४ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि अजमतुल्ला उमरझाईने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. राशीद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

या तीन फलंदाजांशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रचिन रवींद्रने ४१ चेंडूत ३२ धावा केल्या, तर डेव्हन कॉनवेने डावाची सुरुवात करताना १८ चेंडूत २० धावा केल्या. डॅरिल मिशेलची बॅट आज पूर्णपणे शांत राहिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सात चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याला एकच धाव करता आली.

हेही वाचा – IND vs PAK: पीसीबीने आयसीसीकडे भारताची तक्रार केल्याने संतापला दानिश कनेरिया; म्हणाला, “इतरांमध्ये दोष शोधणे…”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs afg match updates afghanistan set a target of 289 runs in front of the new zealand team world cup 2023 vbm