New Zealand vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates in Marathi: सध्याच्या चॅम्पियन इंग्लंडला पराभूत करून अफगाणिस्तानने विश्वचषकातील सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. बुधवारी चेन्नईत होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंड या अफगाणिस्तान संघाला हलक्यात घेण्याची चूक नक्कीच करणार नाही. न्यूझीलंड संघाला स्पर्धेतील आपली अपराजित मोहीम सुरू ठेवायची आहे. दिल्लीत झालेल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानचे लक्ष्य आणखी एक मोठा धक्का देण्याववर असेल. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. हे मैदान फिरकी गोलंदाजांसाठी खूप उपयुक्त आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करणार –

अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. अफगाणिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे न्यूझीलंड संघात नाही. त्याच्या जागी टॉम लॅथम कर्णधार आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून धावगतीच्या आधारावर भारताच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला होता, मात्र तिसऱ्या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या संघाने इंग्लंडसारख्या दिग्गज संघाला पराभूत करून नवा इतिहास रचला. न्यूझीलंडचे नेतृत्व पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम करणार आहे. कारण नियमित कर्णधार केन विल्यमसन डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे काही सामन्यांतून बाहेर आहे.

हेही वाचा – डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू, आकर्षी दुसऱ्या फेरीत

चेपॉकचे मैदान फिरकीपटूंसाठी उपयुक्त –

हे मैदान फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीविरुद्ध न्यूझीलंडला सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, अफगाणिस्तान इंग्लंडप्रमाणे न्यूझीलंडचे समीकरणही बिघडू शकते. अफगाणिस्तानने आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून सर्वांनाच चकित केले होते. आता अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडलाही मोठा धक्का देण्याच्या इराद्याने प्रवेश करेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs afg match updates afghanistan team won the toss and decided to bowl first in world cup 2023 vbm