NZ vs AFG, World Cup 2023: विश्वचषकाच्या १६व्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव केला आहे. यासह अफगाण संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने अफगाणिस्तानसमोर २८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ केवळ १३९ धावा करू शकला आणि १४९ धावांनी सामना गमावला.

न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला

न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव केला आहे. या शानदार विजयासह किवी संघ आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून २८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ३४.४ षटकांत १३९ धावांवर गारद झाला.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
New Zealand cricket team
Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
New Zealand set India a target of 174 in IND vs NZ 3rd Test Match
IND vs NZ : भारताच्या फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले १४७ धावांचे लक्ष्य
IND vs NZ India broke the embarrassing record of 50 years ago
IND vs NZ : भारताचा ५० वर्षांनंतर मायदेशात पहिल्यादांच नकोसा विक्रम, काय आहे ही नामुष्की? जाणून घ्या

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावा केल्या. तर टॉम लॅथमने ६८ धावांची खेळी केली. सलामीवीर विल यंग ५४ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि अजमतुल्ला उमरझाईने प्रत्येकी दोन बळी घेतले. रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक ३६ धावा केल्या. अजमतुल्लाने २७ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लोकी फर्ग्युसनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद या दोघांना मदत केली.

हेही वाचा: IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कशी असेल रोहित शर्माची रणनीती? शमीला मिळू शकते प्लेईंग-११मध्ये खेळण्याची संधी

सॅंटनरने टिपला शानदार झेल

विजयासाठी मिळालेल्या २८९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर केवळ २७ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व रहमत शहा यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल सॅंटनर याने एक अफलातून झेल टिपत शाहिदीची खेळी संपुष्टात आणली. लॉकी फर्ग्युसन याने टाकलेल्या चौदाव्या षटकातील अखेरचा चेंडू आखूड टप्प्याचा आल्यानंतर शाहिदीने पुल करण्याचा प्रयत्न केला. हवेत उडालेला हा चेंडू स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या सॅंटनरपासून काहीशा अंतरावर होता. त्याने धावत जाऊन योग्य अंदाज घेत हा झेल पूर्ण केला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे बोलले जात आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.