Kane Williamson and Tim Southee who played their 100th Test Match : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. हा सामना कर्णधार टीम साऊदी आणि केन विल्यमसन यांचा १००वा कसोटी सामना आहे. सामना सुरु होण्यापूर्वी न्यूझीलंडचे दोन्ही दिग्गज खेळाडू आपल्या मुलांसह मैदानात आले आणि १०० व्या कसोटीचे अनोखे सेलिब्रेशन केले. यानंतर भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने या दोन खेळाडूंना सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या.
भारतीय क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकरने एक्सवर १००वी कसोटी खेळणाऱ्या केन विल्यमसन आणि टिम साऊदीचे कौतुक केले. सचिनने लिहिले की, “केन विल्यमसन आणि टिम साऊदी २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात त्यांच्या स्फोटक कामगिरीपासून न्यूझीलंड क्रिकेटचे प्रणेते आहेत. जवळपास १६ वर्षांनंतर ते १०० वा कसोटी सामना एकत्र खेळत आहे. कट्टर प्रतिप्रर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.” सामन्याच्या अगदी आधी विल्यमसन आणि साऊदी त्यांच्या मुलांसोबत मैदानावर फिरताना दिसले.
गुरुवारी धरमशाला येथे भारत-इंग्लंडच्या पाचव्या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि जॉनी बेअरस्टो आपला १००व्या कसोटीसाठी मैदानात उतरले होते. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (८ मार्च) केन विल्यमसन आणि टिम साऊदी आपला १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. १००व्या कसोटीच्या निमित्ताने विल्यमसन आणि साऊदी आपल्या मुलांसोबत दिसले. दोन्ही खेळाडू मुलांसोबत मैदानात उतरले होते, ज्याचा व्हिडीओ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : १००वा कसोटी खेळणाऱ्या अश्विनसाठी कुलदीप यादवनं दाखवलं मोठं मन, बीसीसीआयने शेअर केला VIDEO
आतापर्यंतची कसोटी कारकिर्द –
ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी वगळता, केन विल्यमसनने ९९ कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने १७४ डावात फलंदाजी करताना ५५.२५ च्या सरासरीने ८६७५ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने ३२ शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २५१ आहे. विल्यमसनने नोव्हेंबर २०१० मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : …आणि रोहित शर्माच्या चुकीवर सर्फराझ खान हसला! VIDEO होतोय व्हायरल
न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम साऊदीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी वगळता, त्याने ९९ कसोटी सामने खेळले असून, १८८ डावांत गोलंदाजी करत २४.४९ च्या सरासरीने ३७८ विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याचा सर्वोत्तम कामगिरी १०८ धाावांत १० विकेट्स राहिली आहे. साऊदीने मार्च २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.