New Zealand vs Bangladesh ODI World Cup 2023 Match Score in Marathi:आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ११व्या सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला . या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने ५० षटकांत ९ गडी गमावून २४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने ४२.५ षटकांत २ गडी गमावून विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने ७८ धावांची खेळी केली. तो जखमी होऊन तंबूत परतला. तसेच डेव्हॉन कॉनवेने ४५ धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र नऊ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने नाबाद १६ धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचबरोबर लॉकी फर्ग्युसन सामनावीर ठरल.

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाने सातत्याने विकेट्स गमावल्याने ५० षटकांत ९ गडी गमावून २४५ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक ६६ धावा केल्या. अनुभवी खेळाडू महमुदुल्लाहने नाबाद ४१ आणि कर्णधार शकीब अल हसनने ४० धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने तीन, ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ट्रेंट बोल्टच्या २०० विकेट्सचा टप्पा पूर्ण –

बांगलादेशविरुद्ध न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वेगवान गोलंदाजाने १० षटके टाकली आणि सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये तनजी हसन, मेहदी हसन मेराज आणि कर्णधार शकीब अल हसन यांचा समावेश होता. या सामन्यादरम्यान किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने विशेष कामगिरी केली. वनडेमध्ये २०० विकेट घेणारा तो न्यूझीलंडचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. किवी संघाकडून वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम डॅनियल व्हिटोरीच्या नावावर आहे. व्हिटोरीने न्यूझीलंडसाठी २९१ सामन्यांत २९७ विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडचा आणखी एक मोठा विजय –

न्यूझीलंड संघाने विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. बांगलादेशचा पराभव करून त्यांनी सलग तिसरा विजय संपादन केला. किवी संघाने यापूर्वी इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता. आता त्याचे तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा दुसरा पराभव आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर त्याला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.