New Zealand vs Bangladesh ODI World Cup 2023 Match Score in Marathi: एकदिवसीय विश्वचषका २०२३ या स्पर्धेतील ११व्या सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचे सलग तिसऱ्या विजयावर लक्ष आहे. त्याने इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचबरोबर बांगलादेशने दोनपैकी एक सामना जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. त्याने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध त्यांचा पराभव झाला होता. आजच्या सामन्यातील नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करणार –

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विश्वचषकात तो प्रथमच मैदानात उतरला आहे. विल्यमसनला आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर तो आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. विल यंगच्या जागी तो परतला आहे. यंगने गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते.

कोणाचे पारडे आहे जड?

न्यूझीलंड आणि बांगलादेश एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ वेळा आमनेसामने आले आहेत, कीवीं हेड-टू-हेडच्या बाबतीत ३०-१० ने आघाडीवर आहेत. त्यांच्यातील एकही सामना अनिर्णित राहिला. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी सर्व सामने किवींनी जिंकले आहेत. अशा स्थितीत बांगलादेशला विश्वचषकात केन विल्यमसनच्या संघाविरुद्धच्या पहिल्या विजयाची अपेक्षा असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

बांगलादेश : लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs ban match updates new zealand won the toss and elected to bowl first against bangladesh in world cup 2023 vbm