New Zealand vs Bangladesh 3rd T20 Match: बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (३१ डिसेंबर) खेळला गेला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी, किवी संघाने माउंट मौनगानुई येथे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात विजय मिळवला. त्यांनी डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून १७ धावांनी सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका बरोबरीत सोडवली. पहिला सामना बांगलादेशने जिंकला तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ १९.२ षटकात ११० धावांवर गारद झाला. त्यांच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. कर्णधार नझमुल हुसेन शांतोने सर्वाधिक १७ धावा केल्या. तौहीदने १६, अफिफ हुसेनने १४, रिशाद हुसेन आणि रॉनी तालुकदारने प्रत्येकी १०-१० धावा केल्या. शमीम हुसेन ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि तनवीर इस्लामने ८ धावा केल्या. सौम्या सरकार आणि मेहदी हसन यांना प्रत्येकी चारच धावा करता आल्या.
सँटनरची जबरदस्त गोलंदाजी
माउंट मौनगानुईमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. टीम साऊदी, बेन सियर्स आणि अॅडम मिल्ने यांनी सुरुवातीला प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याच्या पाठोपाठ गोलंदाजीला आलेल्या कर्णधार सँटनरने अप्रतिम गोलंदाजी केली त्याने तब्बल चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने चार षटकात केवळ १६ धावा दिल्या. साउदी, सियर्स आणि मिल्ने यांनाही शेवटी प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळवले.
सँटनरने फलंदाजीत केली शानदार कामगिरी
१११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने १४.४ षटकात ५ विकेट्स गमावत ९५ धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे खेळ पुढे जाऊ शकला नाही आणि डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडने हा सामना १७ धावांनी जिंकला. किवी संघाकडून फिन अॅलनने सर्वाधिक ३८ धावा केल्या. जिमी नीशम २८ आणि मिचेल सँटनर १८ धावांवर नाबाद राहिले. टीम सेफर्ट, डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी एकच धाव करता आली. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि शरीफुल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बांगलादेशच्या संघाला आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. किवी संघ कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही मालिकांमध्ये यशस्वी ठरला असून त्यांनी सर्व मालिका या बरोबरीत सोडवल्या आहेत.
हेही वाचा: Wasim Akram: वसीम अक्रमला पाकिस्तानचा नव्हे, तर ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे; जाणून घ्या
कर्णधार सँटनरला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बांगलादेशचा गोलंदाज शरीफुल इस्लामला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. विश्वचषकादरम्यानच शाकिबच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला. तो पुनरागमन कधी करणार, याबाबत त्याने कुठलीही माहिती दिलेली नाही.