New Zealand vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी विश्वचषक २०२३ चा ३५ वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा हा निर्णय न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रने चुकीचा ठरवला. कारण नाणेफेक हारल्यानंतर किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ गडी गमावून ४०१ धावा केल्या. न्यूझीलंडने पाकिस्तानला ४०२ धावांचे लक्ष्य दिले आहे. रचिन रवींद्रने १०८ आणि कर्णधार केन विल्यमसनने ९५ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन विकेट्स घेतल्या घेतले.

न्यूझीलंड संघाची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. कॉनवे ३९ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. यानंतर दुखापतीतून परतणाऱ्या केन विल्यमसनने रचिन रवींद्रसोबत १८० धावांची भागीदारी केली. दरम्यान, रचिनने या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. एकाच विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Usman Khawaja becomes first Australian to score a Test double century in Sri Lanka at Galle
Usman Khawaja Double Century : उस्मान ख्वाजाचे ऐतिहासिक द्विशतक! श्रीलंकेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला ऑस्ट्रेलियन
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
third T20 cricket match India against England today sports news
आघाडीचे लक्ष्य; इंग्लंडविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा
IND vs ENG 1st T20I Abhishek Sharma equals Yuvraj Singh record by scoring fastest fifty in 20 balls at home for India
IND vs ENG : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! वादळी खेळीच्या जोरावर युवराज सिंगच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

त्याचबरोबर केल विल्यमसनने ७९ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९५ धावा करून बाद झाला. शतक झळकावल्यानंतर रचिन रवींद्र बाद झाला. तो ९४ चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०८ धावा करून बाद झाला. यानंतर डॅरिल मिशेलने १८ चेंडूत २९ धावा, मार्क चॅपमनने २७ चेंडूत ३९ धावा, ग्लेन फिलिप्सने २५ चेंडूत ४१ धावा केल्या. मिचेल सँटनर १७ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला आणि टॉम लॅथम २ धावांवर नाबाद राहिला. वसीमशिवाय हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – NZ vs PAK, World Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध रचिन रवींद्रने झळकावले वादळी शतक, विराट कोहलीला ‘या’ बाबतीत टाकले मागे

रचिनने कोहलीला टाकले मागे –

रचिन रवींद्रने आज पाकिस्तानविरुद्ध जगातील तिसरे शतक झळकावले. त्याने या विश्वचषकात पाचव्यांदा ५०हून अधिक धावा केल्या. रचिनने जवळपास सर्वच संघांविरुद्ध धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. या विश्वचषकात विराट कोहलीने आतापर्यंत ४४२ धावा केल्या आहेत. त्याचवेळी रचिन रवींद्रने कोहलीला मागे टाकत ५२३ धावा केल्या आहेत. मात्र, रचिनने ८ सामन्यात ५२३ धावा केल्या आहेत, तर कोहलीने केवळ ७ सामने खेळले आहेत.

Story img Loader