Mitchell Santner Corona Infection : कोरोनाने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात प्रवेश केला आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत दिसून आला. न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज मिचेल सँटनर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला आहे. सँटनरला शुक्रवारी सकाळी कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तो पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हा सामना ऑकलंडमध्ये होत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली –

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ईडन पार्कवर जाणार नाही. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. येणाऱ्या काळात त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. येथून तो एकटाच हॅमिल्टन येथील त्याच्या घरी जाणार आहे.

सँटनरची अनुपस्थिती यजमानांसाठी चिंता वाढवणारी –

न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये सँटनर हा एक प्रमुख खेळाडू आहे. त्याने ६४ डावात ६१० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ९३ सामन्यात १०५ विकेट्स आहेत. पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असती.

हेही वाचा – खांदा आणि गळ्याच्या सहाय्याने फलंदाजी, पायाने गोलंदाजी; काश्मीरच्या आमिर हुसैनची प्रेरणादायी गोष्ट

सँटनर नवीन प्रशिक्षकासोबत काम करणार होते –

सँटनर या मालिकेत नव्या प्रशिक्षकासह खेळणार होता. मात्र, पहिल्या टी-२० मध्ये हे शक्य होणार नाही. न्यूझीलंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आंद्रे ॲडम्सची पाकिस्तानविरुद्ध १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲडम्स पाच सामन्यांच्या मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांच्या संघाचा भाग असेल, ज्यामध्ये फलंदाजी प्रशिक्षक ल्यूक रोंचीचाही समावेश आहे. ॲडम्स २०२३ मध्ये महिला संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक होते.

हेही वाचा – SL vs ZIM 3rd ODI : वानिंदू हसरंगाचा मोठा पराक्रम! झिम्बाब्वेविरुद्ध सात विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग

पाकिस्तानची वर्ल्ड कपवर नजर –

पाकिस्तान संघाने येथून टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. येथून नवीन कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीचीही कसोटी सुरू होत आहे, कारण त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच मालिका आहे. पाकिस्तानचा नवा कर्णधार शाहीन आफ्रिदी येथे काही मोठे निर्णय घेऊ शकतो, त्याचा परिणाम विश्वचषकात दिसून येईल हेही आश्चर्यकारक आहे.

Story img Loader