न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तेव्हा पाकिस्तानने तीन गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या आहेत. आणि बाबर आझमचा संघ खेळाडू किवींच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा अजूनही २९५ धावांनी मागे आहेत. पाकिस्तानसाठी आनंदाची बातमी म्हणजे सलामीवीर इमाम-उल-हक अजूनही ७४ धावांवर नाबाद आहे. आता पाकिस्तानच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत.

त्याचवेळी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या डावात दुर्दैवी ठरला आणि ४१ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. तो धावबाद झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. मात्र, या धावबादशिवाय बाबर आझम आणखी एका कारणाने चर्चेत आला होता. त्यामागील कारण म्हणजे या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबर आझम स्लिपमध्ये उभे असताना डान्स करताना दिसत आहे. कदाचित याआधी तुम्ही लाइव्ह मॅचमध्ये बाबरला डान्स करताना पाहिला नसेल, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करण्याची इच्छा होणार नाही. सोशल मीडियावर चाहत्यांकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. त्याचबरोबर ते खूप शेअरही करत आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाचे पारडे जड दिसत आहे. कारण टीम साऊथीच्या संघाकडे अजूनही २९५ धावांची आघाडी आहे. या आघाडीसाठी किवी संघाने मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांचे आभार मानले पाहिजेत. कारण एका टप्प्यावर किवीज ३५० च्या आतच थांबेल असे वाटत होते. पण या दोघांनी १०व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून इतिहास रचला. ज्यामुळे या सामन्यात पाकिस्तान संघ बॅकफूटवर ढकलला गेला आहे.

Story img Loader