New Zealand vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: उपांत्य फेरीतील प्रबळ दावेदार न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका बुधवारी विश्वचषकाच्या ३२व्या सामन्यात आमनेसामने आहेत. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचे सहा सामन्यांतून आठ गुण आहेत. सलग चार विजयानंतर धर्मशालेतील निकाल त्याच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचे (सहा सामन्यांतून दहा गुण) जिंकल्यास त्यांचे १२ गुण होतील आणि ते भारतासोबत उपांत्य फेरीत पोहोचतील.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी एक बदल करून मैदानात उतरले आहेत. लॉकी फर्ग्युसनच्या जागी टीम साऊदीचे न्यूझीलंड संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी तबरेझ शम्सीच्या जागी कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर फिरकीपटूंना मोठी मदत मिळाली असून या जोरावर अफगाणिस्तानने श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने शेवटचा विश्वचषक खेळताना तीन शतकांसह ४३१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रचिन रवींद्रने ४०६ धावा केल्या आहेत. त्याचे शॉट्स पाहण्यासारखे आहेत. त्याशिवाय तो एक चांगला स्पिनर असल्याने तो एक संघासाठी संपूर्ण पॅकेज आहे.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे आज अनावरण! पाहा पहिली झलक, IND vs SL सामन्याआधी मोठा सोहळा

दुखापतग्रस्त रबाडाचे पुनरागमन –

तसेच दक्षिण आफ्रिकेकडे पॉवर हिटर हेनरिक क्लासेन असेल तर न्यूझीलंडकडे जिमी नीशम आहेत. डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी एक्स फॅक्टर आहे तर डॅरिल मिशेल न्यूझीलंडच्या फलंदाजीला खोली देतो. एडन मार्करामची तुलना ग्लेन फिलिप्सशी केली जाऊ शकते. कारण महान फलंदाज असण्याबरोबरच दोघेही चांगले फिरकीपटू आहेत. दोन्ही कर्णधार टेंबा बावुमा आणि टॉम लॅथम यांच्याकडेही विरोधी आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचे पुनरागमन झाले आहे. रबाडाची उपस्थिती प्रतिस्पर्धी संघाला घाबरवण्यासाठी पुरेशी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट.