New Zealand vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३२वा सामना पुण्यातील एमसीएच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा १९० धावांनी दारुण पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डि कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेनच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ४ गडी गमावून ३५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाचा डाव ३५.३ षटकांत १६७ धावांत गारद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा १९० धावांनी पराभव करत विश्वचषकात सहावा विजय नोंदवला. या विजयासह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याचे १२ गुण झाले आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडला एक स्थान गमवावे लागले. तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. सात सामन्यांमधला त्याचा हा तिसरा पराभव आहे. त्याच्या खात्यात आठ गुण आहेत. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. तसेच सामना जिंकल्यास इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत चार विकेट गमावत ३५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ३५.३ षटकांत सर्वबाद १६७ धावांवर आटोपला. त्यांचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. ग्लेन फिलिप्सने ५० चेंडूत ६० धावा केल्या. विल यंगने ३३ आणि डॅरिल मिशेलने २४ धावा केल्या. रचिन रवींद्र आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी नऊ धावा, मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी सात धावा, टॉम लॅथमने चार आणि डेव्हन कॉनवेने दोन धावा केल्या. जेम्स नीशम शून्यावर बाद झाला. मॅट हेन्री खाते न उघडता नाबाद राहिला.

हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या करणार का पुनरागमन? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

महाराज आणि जॅनसेनची दमदार प्रदर्शन –

दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि मार्को जॅनसेन यांनी शानदार गोलंदाजी केली. महाराजांनी नऊ षटकांत ४६ धावा देत चार बळी घेतले. मार्को जॅनसेनने आठ षटकांत ३१ धावांत तीन बळी घेतले. गेराल्ड कोएत्झीने दोन आणि कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.

डी कॉक आणि डुसेनने झळवकावले शतकं –

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत चार गडी गमावून ३५७ धावा केल्या. आफ्रिकन संघाकडून सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकी खेळी खेळली. ड्युसेनने ११८ चेंडूत १३३ धावा केल्या. डी कॉकने ११६ चेंडूत ११४ धावांची खेळी खेळली. डुसेनने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले. तर डी कॉकने १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. डेव्हिड मिलरने ३० चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार टेंबा बावुमाने २४ धावा केल्या. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने गुणतालिकेत झाला बदल –

न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने १२ गुण मिळवले आहेत, ज्यामुळे प्रोटीज संघाने भारताला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यजमान भारताचेही १२ गुण असले तरी नेट रनरेटमधील फरकामुळे आफ्रिकेने अव्वल स्थान गाठले आहे. पराभूत झालेला न्यूझीलंड या सामन्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र चौथ्या स्थानावर घसरला असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आला आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे प्रत्येकी ८ गुण असले तरी नेट रनरेटमधील फरकामुळे त्यांचे स्थान वेगळे आहे.

हेही वाचा – IND vs SL: वानखेडे स्टेडियमवर रंगणार भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामना, जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड संघ ४ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि ९ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला भारत (५ नोव्हेंबर) आणि अफगाणिस्तान (१० नोव्हेंबर) विरुद्ध शेवटचे दोन सामने खेळायचे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs sa match updates south africa beat new zealand by 190 runs in world cup 2023 vbm
Show comments