New Zealand vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३२वा सामना पुण्यातील एमसीएच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. जिथे संघाने क्विंटन डि कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेनच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ४ गडी गमावून ३५७ धावांचा डोंगर उभारला आहे. आता न्यूझीलंडला विजयासाठी ३५८ धावा करायच्या आहेत.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. कारण संघाला पहिला धक्का ३८ धावांवर बसला. कर्णधार टेंबा बावुमा २८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले. येथून क्विंटन डि कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेनने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. यानंतर क्विंटन डि कॉक ११६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी करुन बाद झाला. या दरम्यान त्याने यंदाच्या विश्वचषकातील आपले चौथे शतक झळकावले. रॅसी व्हॅन डर डुसेनने १०१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ड्युसेनने ११८ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १३३ धावा केल्या

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

डेव्हिड मिलरने ३० चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार टेंबा बावुमाने 24 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन सात चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि एडन मार्कराम एका चेंडूवर सहा धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा – SA vs NZ: शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकने झळकावले चौथे शतक, दक्षिण आफ्रिकेसाठी रचला विश्वविक्रम

या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावत इतिहास रचला. विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो त्याच्या संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच यंदाच्या विश्वचषकातील हे त्याचे चौथे शतक आहे. त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकाराच्या ४ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. क्विंटन डी कॉकने १०३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

एकाच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज:

४८६* – क्विंटन डी कॉक – सात डाव – २०२३
४८५ – जॅक कॅलिस – नऊ डाव – २००७
४८२ – एबी डिव्हिलियर्स – सात डाव – २०१५
४४३ – ग्रॅम स्मिथ – १० डाव – २००७
४१० – पीटर कर्स्टन – आठ डाव – १९९२