New Zealand vs South Africa, Test series: न्यूझीलंड दौऱ्यासाठी दुसऱ्या दर्जाचा युवा खेळाडूंचा संघ निवडल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेवर बरीच टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत कसोटीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याच्या वक्तव्यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला (सीएसए) स्पष्टीकरण द्यावे लागले. मालिकेच्या पर्यायी तारखांवर सहमती होऊ शकली नाही, असे त्यांनी त्यांच्या ट्वीटरवरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पोस्ट मध्ये सांगितले की, “आम्ही चाहत्यांना खात्री देतो की, आमच्या आवडत्या खेळाचा सर्वात लांब फॉरमॅट असलेल्या कसोटी क्रिकेटचा दक्षिण आफ्रिकन बोर्डाला अत्यंत आदर आहे. यात कोणत्याही संघाचा आम्ही अनादर केला नाही. मालिकेच्या पर्यायी तारखांवर सहमती होऊ शकली नसल्याने हा तोडगा काढावा लागला.” दक्षिण आफ्रिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी अत्यंत कमकुवत संघ जाहीर केला आहे. १४ जणांच्या युवा खेळाडूला कर्णधार करण्यात आले आहे. कर्णधार नील ब्रँडसह सात अनकॅप्ड खेळाडूंचा या मालिकेत समावेश करण्यात आला आहे.

स्टीव्ह वॉ ने यावर जोरदार टीका केली

सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना स्टीव्ह वॉ म्हणाला, “जर आयसीसी किंवा इतर कोणीतरी या घटनेवर लवकर कारवाई केली नाही तर कसोटी क्रिकेट हे इतिहास जमा होऊन जाईल. कसोटी क्रिकेट ही कसोटी क्रिकेटच राहून जाईल कारण तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्वतःची परीक्षा घेत नाहीये. मला समजले की, मुख्य खेळाडू या दौऱ्यावर येत नाहीत. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही का? नेमकं काय आहे यामागील कारण, आफ्रिकन बोर्डाने स्पष्ट करावे.”

वॉ पुढे म्हणाला, “मला समजत नाही की आयसीसी किंवा जे मोठे देश भरपूर पैसे कमवत आहेत त्यांच्याकडे कसोटी सामन्यांसाठी नियमन शुल्क का नाही. जे एक प्रीमियम क्रिकेट बोर्ड आहेत त्यांनी यावर आवाज उठवणे गरजेचे आहे. कसोटी क्रिकेट ही काळाची गरज असून लोकांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.” तो पुढे म्हणाला, “श्रीमंत क्रिकेट बोर्डाने याबाबत काहीतरी नियम करणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: Steve Waugh: स्टीव्ह वॉने कसोटी क्रिकेट संपुष्टात आल्याबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाला, “ICCने हस्तक्षेप केला नाही तर…”

वॉ पुढे म्हणाला, “मी जर न्यूझीलंडचा खेळाडू असतो तर मी मालिका खेळली नसती. ते का खेळत आहेत हे मला माहीत नाही. न्यूझीलंड क्रिकेटबद्दल आदर नसताना तेथील खेळाडूंनी खेळू नये, ते असे का करत आहेत? माहिती नाही. दक्षिण आफ्रिका नाहीतरी फक्त T१० किंवा टी-२० खेळतात.” क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने कबूल केले की न्यूझीलंड दौऱ्याच्या तारखांसह SA20 लीगचे वेळापत्रक आधीच अंतिम केले गेले होते.

न्यूझीलंड क्रिकेटशी आम्ही बोललो: दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड

क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाने सांगितले की, “तारीखांमध्ये गोंधळ होणार हे स्पष्ट झाल्यावर आम्ही न्यूझीलंड क्रिकेटशी बोललो. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी योग्य वेळ शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. दुर्दैवाने, जागतिक क्रिकेट कॅलेंडरमुळे आणि दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाच्या नियमामुळे ते अशक्य झाले.” दक्षिण आफ्रिकेचा संघ ४ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध पहिला आणि १३ फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. SAT20 लीग १० जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

हेही वाचा: IND W vs AUS W: भारतीय महिला संघाचा एकदिवसीय मालिकेत ०-३ने पराभव, नेटिझन्सने केली टीम इंडियावर जोरदार टीका

न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ

नील ब्रँड (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, रुआन डी स्वार्ड, क्लाईड फोर्टुइन, झुबेर हमझा, त्शेपो मोरेकी, मिहलाली मपोंगवाना, डुआन ऑलिव्हियर, डेन पीटरसन, कीगन पीटरसन, डेन पिएड, रेनार्ड व्हॅन टोंडर, शॉन वॉन बर्ग आणि खाया झोंडो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs sa when criticized for choosing a weak team south africa gave clarification said we respect test avw
Show comments