New Zealand vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ४१वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका संघात पार पडला. बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला १७२ धावांचे लक्ष्य दिले होते. जे न्यूझीलंडने २३.२ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले.
श्रीलंकेला हरवून न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. साखळी फेरीतील त्याचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. न्यूझीलंडचे नऊ सामन्यांतून १० गुण आहेत. त्याने पाच सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. न्यूझीलंडनेही श्रीलंकेला हरवून सलग चार सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. किवी संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्याचा सामना मुंबईत भारताविरुद्ध होईल. आता अफगाणिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.
न्यूझीलंड संघाचा डाव –
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ १७१ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडने २३.२ षटकांत ५ विकेट गमावत १७२ धावा करत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डेव्हान कॉनवेने ४५, डॅरिल मिशेलने ४३ आणि रचिन रवींद्रने ४२ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स १७ धावा करून नाबाद राहिला. केन विल्यमसनने १४ धावा केल्या. मार्क चॅपमन सात धावा करून बाद झाला. टॉम लॅथमने नाबाद ४० धावा केल्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने दोन विकेट्स घेतल्या. महिश तिक्ष्णा आणि दुष्मंथा चमेरा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – NZ vs SL: ट्रेंट बोल्टने विश्वचषकात केला खास पराक्रम, न्यूझीलंडसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
श्रीलंका संघाचा डाव –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. साऊदीने त्याला बाद केले. यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. मेंडिस सहा धावा करून बाद झाला. समरविक्रमा एक धाव आणि चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कुसल परेराही वैयक्तिक ५१ धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या ७४/५ झाली.
श्रीलंकेच्या शेपटाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम –
यानंतर धावांचा वेग कमी झाला, पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज १६ धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा १९ धावा करून बाद झाला. चमिका करुणारत्नेही सहा धावा करून बाद झाली. दुष्मंथा चमीराने एक धाव घेतली. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत ४३ धावांची भागीदारी करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.