New Zealand vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४१ वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आहे. हा सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंड संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. त्याचबरोबर श्रीलंका येथे विजय मिळवून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. किवी संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. फिरकी गोलंदाज ईश सोधीच्या जागी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पावसामुळे दोन्ही संघांचा खेळ खराब होईल. अशा स्थितीत सामना २० षटकांचा झाला, तरी या सामन्यात निकाल निश्चितच हवा, असे दोन्ही संघांना वाटते. न्यूझीलंडचे आठ गुण आहेत. पराभव किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास तो स्पर्धेतून बाहेर पडेल, हे त्याला माहीत आहे. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेही आठ गुण आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.०३६ आहे, तर अफगाणिस्तानचा -०.३३८ आहे.
शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंड किंवा अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास ते दोघेही उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडचा नेट रन रेट सध्या +०.३९८ आहे. न्यूझीलंडसाठी परिस्थिती फारशी चांगली नाही. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागेल.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षाना, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन