New Zealand vs Sri Lanka ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ४१वा सामना आज बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार कुसल परेराच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ षटकांत सर्वबाद १७१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाला १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ ४६.४ षटकांत सर्वबाद १७१ धावांवर आटोपला. कुसल परेराने सर्वाधिक ५१ धावा केल्या. तिक्षीनाने नाबाद ३८ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंड संघ 172 धावांचे लक्ष्य सहज गाठण्याचा प्रयत्न करेल आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय

श्रीलंका संघाचा डाव कसा राहिला –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. तीन धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. साऊदीने त्याला बाद केले. यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. मेंडिस सहा धावा करून बाद झाला. समरविक्रमा एक धाव आणि चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कुसल परेराही वैयक्तिक ५१ धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या ७४/५ झाली.

हेही वाचा – World Cup 2023: ‘टीव्हीसमोर बसलेत आणि यांना पाकिस्तानसाठी…’, वसीम अक्रमने नाव न घेता ‘या’ खेळाडूंवर ओढले ताशेरे

श्रीलंकेच्या शेपटाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम –

यानंतर धावांचा वेग कमी झाला, पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज १६ धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा १९ धावा करून बाद झाला. चमिका करुणारत्नेही सहा धावा करून बाद झाली. दुष्मंथा चमीराने एक धाव घेतली. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत ४३ धावांची भागीदारी करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Story img Loader