Trent Boult’s 50 wickets in the World Cup History: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी केली आहे. या सामन्यात बोल्टने १० षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात ट्रेंट बोल्टनेही विशेष कामगिरी केली आहे. आजपर्यंत न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. आता बोल्ट जगभरातील काही खास गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सचा टप्पा पूर्ण –

या सामन्यात ट्रेंट बोल्टने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६०० विकेट पूर्ण केल्या आहेत. आता बोल्टच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३१७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २१० विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ७४ विकेट्स आहेत. ट्रेंट बोल्ट बराच काळ संघातून बाहेक होता, त्यानंतर त्याने विश्वचषकादरम्यान किवी संघात पुनरागमन केले. बोल्टची आतापर्यंतची कामगिरी चांगलीच आहे.

एकदिवसीय विश्वचषकात ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण –

ट्रेंट बोल्टने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३ विकेट घेतल्या आहेत. आता एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात बोल्टच्या नावावर ५० विकेट्स आहेत. एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत जगात असे फक्त पाच गोलंदाज आहेत, ज्यांनी ५० हून अधिक बळी घेतले आहेत. यातील बहुतांश गोलंदाजांनी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ग्लेन मॅकग्रा आहे, ज्यांच्या नावावर ७१ विकेट्स आहेत. यानंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते, त्याच्या नावावर ६८ विकेट्स आहेत.

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियाचा विश्वचषकात पराभव कसा करता येऊ शकतो? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला ‘फॉर्म्युला’

तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे, ज्याच्या नावावर ५९ विकेट्स आहेत. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा आहे, ज्याच्या विश्वचषकाच्या इतिहासात ५६ विकेट्स आहेत. याशिवाय पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रमचे नाव आहे, ज्याच्या नावावर ५५ विकेट आहेत. आता बोल्ट ५० विकेट्ससह सहाव्या स्थानावर आला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ४१वा सामना आज बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार कुसल परेराच्या अर्धशतकाच्या जोरावर ४६.४ षटकांत सर्वबाद १७१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाला १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे.