NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs in 3rd ODI match : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ईडन पार्कवर खेळला गेला. पाहुण्या संघाने हा सामना १४० धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला २९१ धावाचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात यजमान संघ १५० धावातच गारद झाला. मात्र, न्यूझीलंडने याआधीच सलग पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका जिंकली होती. पण तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने यजमानांचा धुव्वा उडवत मालिकेचा शेवट गोड केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना गाठता आला नाही दुहेरी आकडा –

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी अत्यंत खराब झाली होती. हा सामना जिंकण्यासाठी यजमानांनी २९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याचा पाठलाग करताना किवी संघ २९.४ षटकांत १५० धावांवर गारद झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ज्यामध्ये विल यंग (०), रचिन रवींद्र (१), डॅरिल मिशेल (२), टॉम लॅथम (०), ग्लेन फिलिप्स (०) आणि मिचेल सँटनर (२) यांचा समावेश होता. श्रीलंकेसाठी असिता फर्नांडो, महेश तिक्षना आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ –

न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना मार्क चॅपमनने सर्वाधिक ८१ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला, तरीही तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. या सामन्यात मार्क चॅपमनला यजमान संघातील इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली साथ दिली नाही. म्हणून चॅपमन न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही. ज्यामुळे संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

पथुम निसांकाने साकारली सर्वाधिक धावांची खेळी –

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून २९० धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना पथुम निसांकाने सर्वाधिक ६६ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले. याशिवाय कुशल मेंडिसने ५४ आणि जेनिथने ५३ धावांची खेळी साकारली. याशिवाय कामिंदू मेंडिसने ४६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्रीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs sl sri lanka beat new zealand by 140 runs mark chapman 82 runs in 3rd odi match at eden park vbm