World Cup 2023 4th Team Qualification Scenario: गुरूवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात क्रिकेट विश्वचषकातील महत्त्वाचा सामना रंगणार आहे. श्रीलंका विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे पण हा सामना जिंकून तो न्यूझीलंडचा मार्गही रोखू शकतो. केवळ श्रीलंकाच नाही तर बंगळुरूचे हवामानही न्यूझीलंड संघाचे शत्रू बनले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिले ४ सामने जिंकून शानदार सुरुवात केली होती, मात्र शेवटचे ४ सामने गमावल्यानंतर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. चांगली गोष्ट म्हणजे किवी संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत आणि त्याचा कर्णधार केन विल्यमसनही परतला आहे. न्यूझीलंड ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि स्वत:ला जर अव्वल ४ मध्ये टिकवायचे असेल तर त्याला श्रीलंकेचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करावा लागेल. पावसामुळे न्यूझीलंडचा खेळ खराब होऊ शकतो, कारण सामन्याच्या दिवशी बंगळुरूमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: World Cup 2023: नेदरलँड्स सामन्यापूर्वी अक्षर पटेल टीम इंडियाला भेटला? मोहम्मद सिराजबरोबरचा फोटो व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यादिवशीचे पाऊस पडणार? जाणून घ्या बंगळुरूमधील हवामान

गुरुवारी बंगळुरूमध्ये पावसाची ८० टक्के शक्यता आहे. सकाळी पावसाची शक्यता जास्त असून सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. सामना सुरू होईपर्यंत पावसाची शक्यता ५० टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर होण्याची शक्यता आहे. यानंतर, संध्याकाळीही पावसाची शक्यता आहे, म्हणजेच संपूर्ण सामन्यात पावसाचे ढग असणार असून रिमझिम पाऊस मध्ये खोडा घालण्याची दाट शक्यता आहे.

पाऊस पडल्यास न्यूझीलंडचे नुकसान होईल

पाऊस हा न्यूझीलंडचा सर्वात मोठा शत्रू आहे, श्रीलंका आधीच बाहेर पडली आहे, जर न्यूझीलंड हा सामना खेळू शकला नाही तर त्याचे उपांत्य फेरीत पोहोचणे इतर संघावर अवलंबून असेल. हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अशा स्थितीत न्यूझीलंडला केवळ ९ गुण मिळवता येतील आणि त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला आपापले सामने जिंकून १० गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी असेल. जर सर्व संघांनी आपापले सामने जिंकून १०-१० गुण मिळवले, तर निव्वळ रनरेटच्या आधारे कोणता संघ भारताबरोबर उपांत्य फेरी खेळेल हे ठरवले जाईल. एकूणच न्यूझीलंड विश्वचषकातून यामुळे बाहेर पडू शकते.

हेही वाचा: ENG vs NED: बेन स्टोक्सचे तुफानी शतक! अखेर इंग्लंडच्या फलंदाजांना सूर गवसला, नेदरलँड्ससमोर ठेवले ३४० धावांचे डोंगराएवढे लक्ष्य

न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा १५ सदस्यीय विश्वचषक संघ

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महेश तिक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका, दिमुथ करुणारत्ने , दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दुनिथ वेल्लालागे.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कार्न्धार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, विल यंग, जेम्स नीशम.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs sl will rain cause disruption in new zealand vs sri lanka match know how the weather will be in bangalore avw