New Zealand vs Sri Lanka, 1st Test: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३०२ धावांवर आटोपला, त्यानंतर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य मिळाले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ही कसोटी मालिका श्रीलंका आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ जो सध्या अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. यासाठी श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांवर नाव कोरावे लागेल.

हेही वाचा: IND v AUS: “अरे भाग ना…”, ना दोन धावा मिळाल्या ना विराटचे द्विशतक झाले; उमेश यादवची विकेट जिव्हारी लागली? पाहा video

आतापर्यंत श्रीलंकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या संघाच्या दुसऱ्या डावात अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने ११५ धावांची शानदार खेळी करत अडचणीतून बाहेर पडण्याचे काम तर केलेच शिवाय अधिक चांगले लक्ष्य देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय दिनेश चंडिमलने ४२ तर धनंजया डी सिल्वाने ४७ धावांची शानदार खेळी केली.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: जखमी ख्वाजाच्या जागी सलामीला आलेल्या कुहेनमनचा रडीचा डाव! वेळकाढूपणावर सुनील गावसकरांनी व्यक्त केली नाराजी

टिकनर आणि मॅट हेन्री यांनी गोलंदाजीत आपली ताकद दाखवली

न्यूझीलंडकडून श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात ब्लेअर टिकनर आणि मॅच हेन्री यांनी गोलंदाजीत ४ आणि ३ बळी घेतले. त्याचबरोबर कर्णधार टीम साऊदीनेही २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात ३७३ धावा करून न्यूझीलंडने श्रीलंकन ​​संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून थोडीशी आघाडी निश्चित केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs sl will team indias entry be in the wtc final even before the ahmedabad test is over avw