NZ W vs AUS W Ellyse Perry 2000 runs and 100 wickets Completes in T20I : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा यूएईत होत आहे. या स्पर्धेतील १० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड १० ऑक्टोबरला आमनेसामने आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने बॅटने चमत्कार करून इतिहास रचला. या सामन्यात एलिस पेरीने ३० धावा करताच एक मोठी कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ॲलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ॲलिसा हिली पॅव्हेलियनमध्ये परतली. हिली आणि मुनी यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. हिली आऊट झाल्यानंतर एलिस पेरी फलंदाजीला आली आणि तिने मुनीसह ४५ हून अधिक धावांची भागीदारी केली. यानंतर मुनीही १२व्या षटकात ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर पेरीने फोबी लिचफिल्डसह डाव सावरला.

एलिस पेरीच्या नावावर झाली खास विक्रमाची नोंद –

यादरम्यान पेरीने १४व्या षटकात चार चौकारांसह आपली वैयक्तिक ३० धावा करताच तिने नवा विक्रम रचला. या चौकारांसह एलिस पेरीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा आणि १०० विकेट्स पूर्ण करणारी पुरुष आणि महिला क्रिकेटमधील केवळ पाचवी खेळाडू ठरली. पेरीच्या आधी, फक्त ४ खेळाडू टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा आणि १०० विकेट्स घेण्याचा महान पराक्रम करू शकले आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पेरी ही केवळ तिसरी महिला खेळाडू आहे. यापूर्वी सोफी डिव्हाईन, हेली मॅथ्यूज आणि निदा दार यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs BAN : दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल, दिल्लीत ‘लोकल बॉय’ करणार पदार्पण?

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा आणि १०० विकेट्स घेणारे क्रिकेटपटू :

  • शकीब अल हसन
  • सोफी डिव्हाईन
  • हेली मॅथ्यूज
  • निदा दार
  • एलिस पेरी