Pakistan vs Australia, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये पाकिस्तान संघ अडचणीत सापडला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघात व्हायरल फिव्हर म्हणजेच तापाने काही खेळाडू आजरी आहेत. अनेक खेळाडू याला बळी पडले आहेत. मात्र, आता बहुतांश खेळाडूंची प्रकृती बरी होत आहे. दोन खेळाडू अजूनही गंभीर आजारी आहेत. त्यापैकी एकाला खूप ताप असून त्याच्यावर पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे आणि अशातच संघासाठी ही वाईट बातमी समोर आल्याने बाबरच्या चिंतेत भर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचा संघ सध्या बंगळुरूमध्ये आहे. २० ऑक्टोबरला हा संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल इन्फेक्शनमुळे पाकिस्तानचे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. बहुतेक संघातील महत्वाचे खेळाडू ज्यामध्ये मोहम्मद रिझवान, हारिस रौफ हे आता बरे झाले असले तरी, तरी किमान दोन खेळाडू अजूनही आजारी आहेत आणि एक अद्याप तापाने ग्रस्त आहे.

काल संध्याकाळी, पाकिस्तान संघ बंगळुरूमधील त्यांच्या हॉटेलमधून जेवणासाठी निघाला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (१७ ऑक्टोबर) स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत संघाचे सराव सत्र होणार होते, ज्याची वेळ आता रात्री ८ पर्यंत कमी करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

हेही वाचा: SA vs NED: स्कॉट एडवर्ड्सची कर्णधारपदाला साजेशी खेळी! दुबळ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला झुंजवले, विजयासाठी ठेवले २४६ धावांचे लक्ष्य

पाकिस्तानचे मीडिया मॅनेजर अहसान नागी म्हणाले, “गेल्या काही दिवसांत काही खेळाडूंना ताप आला होता आणि त्यातील बहुतेक जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातील काही जण अजूनही बरे होत असून दोन खेळाडू तापाने आजारी आहेत. जे रिकव्हरी स्टेजवर आहेत ते टीम मेडिकल पॅनलच्या देखरेखीखाली आहेत. पाकिस्तान आज एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत सराव करेन.” जे दोन खेळाडू अजूनही आजारी आहेत त्यांची नावे सांगण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला आहे.

नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तानने हैदराबादमध्ये त्यांच्या विश्वचषक मोहिमेची जोरदार सुरुवात केली. मात्र, १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. संघाला आशा आहे की खेळाडूं लवकरच या पराभवातून बाहेर पडतील. सर्व खेळाडू जरी तंदुरुस्त नसले तरी २० ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सध्या, पाकिस्तानचे तीन सामन्यांत मिळून चार गुण असून विश्वचषकाच्या गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषकात गांगुलीच्या खास विक्रमावर रोहितचे लक्ष्य, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीलाही टाकू शकतो मागे

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi wc 2023 pakistan in trouble before the match against australia two players ill one is in bad condition avw