ICC World Cup Trophy Launch: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने केले आहे. पृथ्वीपासून १.२० लाख फूट उंचीवर असलेल्या स्पेस स्ट्रॅटोस्फियरमध्ये त्याचे अनावरण करण्यात आले. त्या उंचीवर उणे ६५ अंश तापमान असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने माहिती दिली की प्रतिष्ठित ट्रॉफी बेस्पोक स्ट्रॅटोस्फेरिक बलूनद्वारे अंतराळात पाठवण्यात आली आणि त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर धमाकेदार लँडिंग केले. या ऐतिहासिक प्रक्षेपण आणि लँडिंग दरम्यान, ४००० कॅमेर्यांनी पृथ्वीच्या वातावरणाच्या काठावरून एकदिवसीय (ODI) विश्वचषक ट्रॉफीचे काही अप्रतिम शॉट्स, टिपले, जे पाहण्यास चाहते गर्दी करत आहेत. एक अतिशय सुंदर व्हिडिओ देखील त्यात आला प्रसिद्ध करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर ट्रॉफीचे लँडिंग झाले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) मंगळवारी, २७ जून रोजी स्पर्धेचे वेळापत्रक सकाळी ११.३०वाजता जाहीर केले.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट केले की, “क्रिकेट विश्वचषक २०२३ची ट्रॉफी अंतराळात अनावरण होत असताना क्रिकेट जगतासाठी हा एक अनोखा क्षण आहे. अंतराळात पाठवलेल्या क्रीडा ट्रॉफींपैकी ही एक आहे आणि आम्ही एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. खरंच भारतातील आयसीसी पुरुष विश्वचषक ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात चांगली झाली आहे.”
विश्वचषक ट्रॉफीचा दौऱ्याला २७ जूनपासून सुरू होत आहे आणि ट्रॉफी कुवेत, बहरीन, मलेशिया, यू.एस.ए., नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आणि यजमान भारतासह जगभरातील १८ देशांमध्ये प्रवास करेल. या दौऱ्याच्या माध्यमातून लाखो क्रिकेट चाहत्यांना विविध उपक्रमांद्वारे या झगमगत्या ट्रॉफीला न्याहाळता येणार आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अॅलार्डिस म्हणाले की, “आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी दौरा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयसीसी विश्वचषकाची आम्ही वाट पाहात आहोत. क्रिकेटचे एक अब्जाहून अधिक चाहते आहेत. जास्तीत जास्त लोकांनी ही ट्रॉफी जवळून पाहावी अशी आमची इच्छा आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “क्रिकेट हा देश इतर खेळांपेक्षा अधिक जोडतो. देशात उत्साहाचे वातावरण आहे. आम्ही जगातील दहा सर्वोत्तम संघांपैकी एक असून सहा आठवड्यांच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत. विश्वचषकाची काउंट डाऊन सुरू झाले आहे आणि ट्रॉफी टूर चाहत्यांसाठी या मेगा इव्हेंटचा भाग होण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.”