भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी अवघे काही महिने शिल्लक आहेत, ज्यासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. कारण बीसीसीआयने एकदिवसीय विश्वचषक २०२३ (BCCI Shortlist Players) साठी २० खेळाडू निवडले आहेत. आता यासोबतच चाहते आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये या शॉर्टलिस्टबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशात भारताचे माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना, श्रीकांत यांनी २० खेळाडूंच्या यादीबद्दल विस्तृतपणे चर्चा केली. त्यांनी अशा दोन क्रिकेटपटूंची नावे सांगितले आहे, ज्यांनी आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ नये असे त्यांना वाटते. श्रीकांत यांच्या मते, ते दोन खेळाडू शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर आहेत. अलीकडेच जेव्हा वरिष्ठ खेळाडू संघात नव्हते, तेव्हा गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग झाला आहे.
गेल्या वर्षी रोहित शर्माला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी विश्रांती देण्यात आली, तेव्हा गिलला वनडेमध्ये संधी मिळाली. त्यानंतर टीम इंडियाने बांगलादेश मालिकेसाठी संघाची घोषणा केली, तेव्हा रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत असल्याने गिलला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. पण आता शिखर धवनला संघातून वगळण्यात आल्याने गिलला श्रीलंकेविरुद्धच्या होम वनडेमध्ये स्थान मिळाले आहे.
कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “जर तुम्हाला माझे मध्यम ते वेगवान गोलंदाज हवे असेल, तर ते जसप्रीत बुमराह, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज असतील. चार मध्यमगती गोलंदाज पुरेसे आहेत. मी निवड समितीचा अध्यक्ष म्हणून बोलत आहे, चाहता म्हणून नाही आणि मला विश्वास आहे की हेच लोक सामने जिंकतील, तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला सामने जिंकायचे आहेत, तुम्हाला युसूफ पठाणसारखा खेळाडू हवा आहे, जो तुम्हाला एकहाती सामने जिंकून देईल.”
श्रीकांत पुढे म्हणाले, “त्यांनी तुम्हाला दहापैकी तीन सामने दिले तरी ते पुरेसे आहे. या खेळाडूंकडून सातत्याची अपेक्षा करू नका. सध्या आमच्या संघात ऋषभ पंत असा खेळाडू आहे, त्याच्याकडून सातत्याची अपेक्षा करू नका. मला सातत्य नको आहे, मला सामने जिंकायचे आहेत आणि जर हे लोक ते एकट्याने करू शकत असतील तर उत्तम. तुमच्यासाठी हे कोण करेल? ऋषभ पंत तुमच्यासाठी ते करेल.”
हेही वाचा – Sania Mirza Retirement: ‘या’ स्पर्धेनंतर निवृत्त होणार’, टेनिसपटू सानिया मिर्झानं घेतला मोठा निर्णय!
शार्दुल ठाकूर बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला होता, पण श्रीलंका मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. शिवाय, श्रीकांत यांनी माजी निवडकर्त्याच्या दृष्टीकोनातून आपले मत दिले. तसेच सांगितले की विश्वचषकासाठी तो अशा खेळाडूंवर अवलंबून असेल जे एकट्याने सामने जिंकून देऊ शकतात.