ODI World Cup 2023 Qualifier Schedule Announced: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रिकेटचा हा महाकुंभ सुरू होण्यास फार दिवस उरले नाहीत. उद्या म्हणजेच १८ जूनपासून २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे क्वालिफायर सामन्यांना सुरुवात होणार. पात्रता फेरीशी संबंधित वेळापत्रक आयसीसी जाहीर केले आहे.
भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन जागांसाठी १० संघ दावेदार आहेत. या १० संघांमध्ये १८ जून ते ०९ जुलै या कालावधीत पात्रता फेरी खेळवली जाणार आहे.
१० संघांमध्ये ३४ सामने खेळवले जाणार –
आयसीसी २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीत एकूण १० संघ सहभागी होत असून यामध्ये एकूण ३४ सामने खेळले जाणार आहेत. वास्तविक, आठ संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले होते. आता उर्वरित दोन स्थानांसाठी १० संघ पात्रता फेरीत भाग घेतील. यामध्ये झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, नेदरलँड, श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान, नेपाळ, अमेरिका आणि यूएई या संघांचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड्स, नेपाळ आणि अमेरिका यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. तर श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि यूएई यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – Ashes series 2023: जो रुटने झळकावले शानदार शतक, इंग्लडने ९४ वर्षांनंतर केला ‘हा’ खास कारनामा
पात्रता फेरीचे स्वरूप कसे आहे –
सर्व प्रथम, दोन्ही गटांचे संघ आपापल्या गटात उपस्थित असलेल्या उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. २७ जूनपर्यंत ग्रुप स्टेजमध्ये एकूण २० सामने होतील. यानंतर दोन्ही गटातील टॉप-३ संघ मिळून सुपर-६ मध्ये स्थान मिळवतील.
सुपर-६ चे सामने २९ जूनपासून सुरू होणार आहेत. सुपर-६ टप्प्यात, सर्व संघ त्या संघांविरुद्ध सामने खेळतील ज्यांच्याविरुद्ध ते गट टप्प्यात खेळले नाहीत. येथूनच संघ अंतिम फेरीसाठी लढतील. अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. दोन्ही संघांना विश्वचषकात ९वे आणि १०वे स्थान मिळेल.