नवी दिल्ली : सलामीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, रविवारी अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवून निव्वळ धावगती वाढवण्याचे लक्ष्य असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गतविजेत्या इंग्लंडला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडने हा सामना नऊ गडी राखून सहज जिंकला होता. मात्र, इंग्लंड संघाने विजयी पुनरागमन करताना बांगलादेशवर १३७ धावांनी मात केली. आता ही लय अफगाणिस्तानविरुद्ध कायम राखण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ५ बाद ४२८ अशी विश्वचषक विक्रमी धावसंख्या उभारली होती आणि श्रीलंकेने ३२६ धावांपर्यंत मजल मारली होती. या स्टेडियमवरील पुढील सामन्यात अफगाणिस्तानने दिलेले २७३ धावांचे लक्ष्य भारताने ३५ षटकांतच गाठले होते. त्यामुळे इंग्लंडचाही रविवारी होणाऱ्या लढतीत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi world cup cricket tournament england vs afghanistan cricket match sport news amy