ODI World Cup: ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेत १० संघ खेळणार आहेत. एकूण ४८ सामने १० ठिकाणी खेळवले जातील. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ नोव्हेंबरला पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्येच होणार आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

मात्र, आतापर्यंत टीम इंडिया आपल्या संघाबद्दल संभ्रमात आहे. भारताचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत, त्यापैकी दोन मुख्य यष्टिरक्षक फलंदाज आहेत. के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी अद्याप संघात पुनरागमन केलेले नाही. मात्र, विश्वचषकापर्यंत राहुल तंदुरुस्त असेल, असे मानले जात आहे पण, बीसीसीआयने याला दुजोरा दिलेला नाही. विश्वचषकापूर्वी भारताला आशिया कप खेळायचा आहे. या स्पर्धेतून टीम इंडियाची तयारी कळेल.

KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Hardik Pandya Trolled For His Behavior and Showing Attitude to Arshdeep Singh in IND vs SA 2nd T20I
IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!

हेही वाचा: Babar Azam: बाबर आझमकडून कर्णधारपद जाणार का? माजी खेळाडू इंझमाम-उल-हकने केला मोठा खुलासा

बीसीसीआयने अद्याप आशिया चषक किंवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केलेला नाही. अजूनही अनेक खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे. राहुलशिवाय श्रेयस अय्यरही जखमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय ५ सप्टेंबरपर्यंत संघाची घोषणा करू शकते. मात्र, सर्वात मोठी चिंता यष्टिरक्षकाची आहे. पंतच्या अनुपस्थितीत राहुल तंदुरुस्त होणार की नाही याचीच चर्चा रंगली आहे.

जर तोही खेळला नाही तर इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात विश्वचषकासाठी कोणाची निवड होणार? हे पाहावे लागेल. या सर्व शंकांच्या पार्श्‍वभूमीवर आणखी एका भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने ट्वीट करून सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले. वास्तविक, एका चाहत्याने ट्वीट करून विचारले होते, “भारताचा विकेटकीपर कोण असेल?” यावर टीम इंडियातून बाहेर पडलेला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिले. फॅन्सच्या ट्वीटला उत्तर देत कार्तिकने आणखी एक ट्वीट केले आहे. त्याने लिहिले की, “तुम्ही मला विश्वचषकात नक्कीच पाहाल पण ते सर्व बीसीसीआयच्या हातात आहे, अजून काय सांगू…” यासोबतच कार्तिकने एक लक्षवेधी इमोजीही टाकला आहे.

हेही वाचा: Asian Games: आईच्या अंत्यसंस्काराला न जाता देशासाठी थांबला, पण सरकारी गलथानपणामुळे रखडली आशियाई स्पर्धेची तयारी!

३८ वर्षीय कार्तिक शेवटचा टी२० विश्वचषक भारताकडून खेळताना दिसला होता. मात्र, या ट्वीटमध्ये त्यांनी जे म्हटले ते बरोबर आहे. विश्वचषकात तो खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचक म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. कार्तिक नुकताच अ‍ॅशेसमध्ये कॉमेंट्री करताना दिसला. अशा स्थितीत तो विश्वचषकातही दिसू शकतो. कार्तिक याआधी २०१९ वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव झाला. यानंतर तो २०२२च्या टी२० वर्ल्ड कपमध्येही दिसला. मात्र, त्यानंतर कार्तिकला खेळण्याची संधी मिळाली नाही. कार्तिकचा आयपीएलमध्ये यंदाही खराब फॉर्म होता.

मात्र, कार्तिक अद्याप निवृत्त झालेला नाही. त्याने ५ सप्टेंबर २००४ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. आतापर्यंत त्याने भारतासाठी २६ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ६० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १०२५ धावा, एकदिवसीय सामन्यात १७५२ धावा आणि टी२० मध्ये ६८६ धावा आहेत. कसोटीशिवाय त्याचे कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक नाही. त्याने कसोटीतही शतक झळकावले आहे.