टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास आहे की, वेगवान गोलंदाज उमरान मलिक यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असू शकतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज असे वेगवान गोलंदाज सध्या विश्वचषक खेळण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघातील काही जागा निश्चित असल्यासारखे दिसत आहेत, परंतु काही जागा अशा आहेत जिथे कोण खेळणार हे योग्य वेळी ठरवले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्पीड सेन्सेशन उमरान मलिक एकामागून एक सामन्यात वादळ निर्माण करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० मध्ये उमरानने २.१ षटकात ९ धावा देत २ बळी घेतले. यादरम्यान उमरानने ताशी १५० किलोमीटर वेगाने एवढा धोकादायक चेंडू टाकला की ब्रेसवेलचे धाबे दणाणले. त्याने पदार्पण केल्यापासूनच वेगवान संवेदनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे. उमरान भागीदारी तोडण्यात मास्टर आहे. या वेगवान गोलंदाजाने गेल्या ८ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत. उमरानच्या शानदार गोलंदाजीवर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. उमरानचा एकदिवसीय विश्वचषकासाठी १५ खेळाडूंच्या संघात समावेश करावा, असे शास्त्री यांचे म्हणणे आहे.
उमरान मलिकने त्याचा वेग तसेच लाईन आणि लेंथ गोलंदाजीने प्रभावित केले आहे. गेल्या आठ सामन्यांमध्ये २५ वर्षीय उमरानने १५ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दोनदा एका डावात तीन विकेट्स घेतल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटते की त्याला टी२० पेक्षा ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जास्त संधी आहेत. आजकाल ज्याप्रकारे अधिक क्रिकेट खेळले जात आहे, त्याला नेहमीच संधी मिळू शकते.”
उमरानच्या गोलंदाजीत विविधता
तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान शास्त्री म्हणाले, “मला वाटते की त्याला टी२० पेक्षा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळू शकतील आणि जे क्रिकेट खेळले जात आहे, तो नेहमीच संघात असेल कारण दुखापती कधीही होऊ शकतात.” विश्वचषकासाठी खेळाडूंचा फिटनेस महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आयपीएलचा भार गोलंदाज कसा घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकदिवसीय मालिकेचा भाग होण्याची शक्यता आहे
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर उमरान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग होण्याची शक्यता आहे. बुमराहच्या पुनरागमनावर शास्त्री म्हणाले, “तुम्हाला बुमराह परत हवा आहे कारण तो टीम इंडियाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो एक स्टार असून मला आशा आहे की पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतेल. भारतासाठी त्याची गोलंदाजी या खूप बळ देणारी ठरते. इतरांच्या तुलनेत टीम इंडिया अधिक मजबूत होते. भारताने घरच्या मैदानावर मोठा विक्रम केला आहे. संघातील इतर खेळाडू तंदुरस्त असून बुमराहच्या येण्याने मोठा फरक पडू शकतो. अर्शदीपमध्येही तुम्हाला विविधता दिसेल, कुलदीप आणि चहलने चांगली गोलंदाजी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर हा रोहितसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.”