ICC ODI World Cup 2023 Pakistan Cricket Team: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षाच्या अखेरीस भारतात होणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेटचा संघ यात सहभागी होणार आहे की नाही याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्ही या स्पर्धेत सहभागी होणार असे मान्यता अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याशिवाय विश्वचषक होणार का? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात निर्माण होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाच्या समाप्तीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या मेगा इव्हेंटचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. आयसीसी बोर्ड सदस्याने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताचे पाकिस्तानात जाणे आणि पाकिस्तानचे भारतात येणे या दोन्ही देशांच्या बोर्डावर अवलंबून नाही. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही पीसीबी सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निर्णय घेऊ शकते.

हेही वाचा: IPL 2023: आयपीएल २०२३मध्ये ‘धोनी फॅक्टर’ने CSKला कसे बनवले पॉवरफुल, रवी शास्त्रींनी सांगितली संपूर्ण कहाणी

आशिया चषकाच्या आयोजनावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये हे दंद्वयुद्ध पाहायला मिळत आहे. पीसीबीचे हायब्रीड मॉडेल उर्वरित देशांनी नाकारल्यानंतर आता आशियाई क्रिकेट परिषद (ACC) सप्टेंबर महिन्यात श्रीलंकेत आयोजित करण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानही आशिया चषकातून बाहेर पडू शकतो. आशिया चषकाबाबत पाकिस्तानने केलेल्या हायब्रीड प्लॅनप्रमाणे भारताने आपले सामने यूएईमध्ये खेळवले असते आणि उर्वरित संघ केवळ पाकिस्तानमध्येच खेळले असते. यालाही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काही अधिकारी जिओ टीव्हीवर बोलताना म्हणाले, “जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात खेळायला येऊ शकत नाही तर आम्हीही विश्वचषक २०२३मध्ये सहभागी होणार नाही. आमच्याशिवाय विश्वचषक खेळा.” वास्तविक, पाकिस्तान आशिया चषक २०२३चे आयोजन करत आहे, परंतु बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानला जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये या मुद्द्यावरून दररोज वाद होत आहेत. अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानात जाणार का? आणि पाकिस्तानचा संघ भारतात येणार का? या प्रश्नांची उत्तरे दोन्ही देशांच्या सरकारवर अवलंबून आहेत.

हेही वाचा: The Elephant Whisperers: माहीची ग्रेट-भेट! धोनीने ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ टीमला CSKची जर्सी दिली गिफ्ट

पाकिस्तानात सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेमुळे तेथील परिस्थिती अधिक बिघडली आहे. अशात बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी भारताला पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले जातेय. बीसीसीआयने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जर पाकिस्तान आला तर त्यांचे बहुतांश सामने बंगळुरू आणि चेन्नईसारख्या भारतातील दक्षिणेकडील शहरांमध्ये आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.