India vs New Zealand:  भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने मागील ४ एकदिवसीय सामन्यात ३ शतके ठोकली आहेत. त्याची दोन शतके ही नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत आली होती. यानंतर आता विराट न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात सामील झाला आहे. या मालिकेतूनही चाहत्यांना विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विराट दोन आकडी धावसंख्याही करू शकला नाही. तो या सामन्यात लवकर तंबूत परतला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला आणि तो जबरदस्त लयीत दिसत होता. पण १० चेंडूतच पॅव्हेलियनमध्ये परतला. या डावात त्याने शानदार चौकारही मारले. मिचेल सँटनरने त्याला त्रिफळाचीत केले.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १६६ धावांची दमदार खेळी खेळली, जी त्याच्या कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम खेळी होती. त्याने ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याची दमदार खेळी पाहून न्यूझीलंडविरुद्धही विराटच्या बॅटमधून धावा निघतील, अशी आशा चाहत्यांना वाटत होती, पण पहिल्या वन डेत सॅन्टनरच्या षटकात कोहली त्रिफळाचीत होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली आणि खुद्द कोहलीही दिसला. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.

डावाचे १६वे षटक टाकण्यासाठी न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर खेळपट्टीवर आला होता. यावेळी त्याने पहिला चेंडू टाकला, ज्यावर विराटला एकही धाव घेता आली नाही. त्यानंतर सँटनरच्या दुसऱ्या चेंडूने विराटला चकवत यष्टींचा वेध घेतला. त्यामुळे विराटला त्रिफळाचीत होऊन तंबूत परतावे लागले. विराट बाद झाला, तेव्हा तो ८ धावांवर खेळत होता. विराटने यादरम्यान १० चेंडूंचा सामना करताना फक्त १ चौकार मारला होता. विराट बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या २ बाद ८८ धावा इतकी होती. आता विराट बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs NZ 1st ODI: टॉम लॅथमच्या ग्लोव्हजनी घेतली हार्दिक पांड्याची विकेट? मैदानावर सगळेच होते संभ्रमात, पण थर्ड अंपायर वादाच्या भोवऱ्यात!

न्यूझीलंडसमोर ३५० धावांचे आव्हान

हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३५० धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने ५० षटकांत आठ विकेट गमावत १४९ धावा केल्या. शुबमन गिलने सर्वाधिक २०८ धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. शुभमनशिवाय रोहित शर्माने ३४, सूर्यकुमार यादवने ३१, हार्दिक पांड्याने २८ आणि वॉशिंग्टन सुंदरने १२ धावा केल्या. विराट कोहली आठ आणि इशान किशन पाच धावा करून बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oh what happened virat who scores centuries hits a hat trick on a single santner blows the wickets avw