Ojas Devtale and Jyoti Vennam win gold in compound mixed team event in archery: १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे खेळली जात आहे. या स्पर्धेच्या ११व्या दिवशीही (बुधवार) भारताच्या सुवर्ण कामगिरीची घोडदौड सुरुच आहे. आज तिरंदाजीमध्ये ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी दक्षिण कोरियाचा १५९-१५८ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. ओजस आणि ज्योती यांनी इतिहास रचला आहे. भारतीय तिरंदाज ज्योती आणि ओजस यांनी सेमीफानलमध्ये कझाक तिरंदाजांचा १५९-१५४ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळाले आजचे पहिले पदक –

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने मिश्र ३५ किमी शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. चीनला सुवर्ण तर जपानला रौप्य पदक मिळाले. पीव्ही सिंधूने कुसुमा वरदानीविरुद्ध चमकदार कामगिरी केली. तिने हा सामना २१-१६, २१-१६ अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, पदक जिंकण्यासाठी तिला आपली जुनी लय पुन्हा मिळवावी लागणार आहे.
२०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे.

२०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ११ व्या दिवशी दोन पदके जिंकून, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवीन विक्रम केला आहे. सध्या भारताच्या खात्यात आता ७१ पदके आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक ७० पदके जिंकली होती. जकार्ता येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने हा विक्रम केला होता. तेव्हा भारताने १६ सुवर्ण, १३ रौप्य आणि ३१ कांस्यपदके जिंकली होती.

हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023: आता मॅचेस बघताना मिळणार नवीन अनुभव; Disney+ Hotstar ने लॉन्च केले ‘हे’ भन्नाट फिचर

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत जिंकलेली पदके –

सुवर्ण: १६
रौप्य: २६
कांस्य: २९
एकूण: ७१