डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा याने घेतलेल्या चार बळींमुळेच बंगाल संघाने रणजी क्रिकेट स्पर्धेत यंदाचा पहिला विजय मिळविला. त्यांनी विदर्भ संघावर १०५ धावांनी मात केली.
विजयासाठी २९७ धावांचे आव्हानास सामोरे जाताना विदर्भ संघाने बिनबाद तीन धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. गणेश सतीश याने एका बाजूने चिवट झुंज दिली, मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी सपशेल निराशा करीत पराभव ओढवून घेतला. सतीश याने ११ चौकार व एक षटकारासह ९६ धावा केल्या. तो बाद झाला त्या वेळी विदर्भ संघाची ८२ षटकांत ९ बाद १८३ अशी स्थिती होती. निर्णायक विजयासाठी शेवटच्या विकेटच्या प्रतीक्षेत असलेल्या बंगालच्या खेळाडूंनी दोन जीवदान दिले. मात्र वीरप्रतापसिंह याने रविकुमार ठाकूर याला बाद करीत बंगालच्या निर्णायक विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
बंगाल ३३४ व १६४
विदर्भ २०२ व ९१.१ षटकांत सर्व बाद १९१ (गणेश सतीश ९६, सुब्रमण्यम बद्रिनाथ ३१, प्रग्यान ओझा ४/६०, वीरप्रतापसिंह ३/२३).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा