६ चेंडूत ६ षटकार लगावण्याचा पराक्रम म्हंटला की भारतीय चाहत्यांना आठवतो तो युवराज सिंग. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या गोलंदाजीवर युवराजने ६ षटकार लगावले होते आणि सर्वात जलद टी२० अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. याच पद्धतीचा पराक्रम पुन्हा एकदा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत १८ वर्षाच्या ऑलिव्हर डेव्हिस याने ६ चेंडूत ६ षटकार मारले आणि द्विशतक झळकावले.

अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत डेव्हिसने सहा चेंडूत सहा षटकार लागण्याचा पराक्रम केला. या बरोबरच त्याने ११५ चेंडूंमध्ये २०७ धावा केल्या. डेव्हिसच्या द्विशतकाच्या जोरावर नॉर्दन टेरिटरीविरुद्ध न्यू साऊथ वेल्स संघाने ५० षटकात ४ बाद ४०६ धावांपर्यंत मजल मारली. ४०व्या षटकात त्याने हा पराक्रम केला. फिरकीपटू जॅक जेम्स याच्या गोलंदाजीवर त्याने सहाच्या सहा चेंडू मैदानाबाहेर पोहोचवले. या स्पर्धेत १९ वर्षाखालील स्पर्धेत द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला.

पहिल्या दोन षटकारांच्या नंतर मी विचार केला की मी सहा चेंडूत सहा षटकार लगावू शकतो. मग मी प्रत्येक चेंडू त्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली आणि ते खरंच शक्य झाले, असे डेव्हिसने या पराक्रमानंतर सांगितले.

Story img Loader