Cricket Record, 6 Wickets in 6 Balls: क्रिकेट या खेळ असा आहे की ज्यात रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षण. खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर काही ना काही पराक्रम गाजवतात. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा असे काही घडते, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. कधी अशक्य उद्दिष्टे गाठली जातात तर कधी अशक्य झेल पकडले जातात. मात्र, अलीकडेच अशाच एका युवा गोलंदाजाने असा विक्रम केला आहे ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. असाच एक अशक्य वाटणारा पराक्रम क्रिकेटच्या मैदानावर घडला, जेव्हा एका ज्युनियर खेळाडूने ६ चेंडूत ६ विकेट्स घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ खेळाडूने दुर्मिळ कामगिरी केली

क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, प्रत्येक गोलंदाजाला हॅटट्रिक करायची असते. कोणत्याही फॉरमॅटमध्ये हॅटट्रिक घेणे दुर्मिळ आहे, परंतु १२ वर्षांच्या मुलाने एकदा नव्हे तर दोनदा केले. ऑलिव्हर व्हाईट हाऊस नावाच्या या खेळाडूने आपल्या क्लबसाठी आश्चर्यकारक ओव्हर फेकले. ऑलिव्हरने या षटकात ‘दुहेरी हॅट्ट्रिक’ पूर्ण केली, म्हणजे प्रत्येक चेंडूवर विकेट मारली.

२ षटकात धावा न देता ८ विकेट्स घेतल्या

ऑलिव्हर व्हाइट हाऊसने या महिन्यात कुकहिलविरुद्ध ‘ब्रॉम्सग्रोव्ह’ क्रिकेट क्लबकडून खेळताना हा पराक्रम केला. ऑलिव्हरने ६ चेंडूत प्रतिस्पर्धी संघाच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑलिव्हरने दोन षटकांत एकही धाव न देता तब्बल आठ विकेट्स घेतल्या. ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लब संघाचा कर्णधार जेडेन लेविटने बीबीसीला सांगितले, “त्याने (ऑलिव्हर) जे काही साध्य केले त्यावर माझाच काय जगातील कोणत्याच खेळाडूचा विश्वास बसणार नाही. पण त्याने हे करून दाखवले असून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, त्याच्याबद्दल आत्ताच सगळे सांगणे कठीण आहे. मात्र, भविष्यात तो खूप मोठा क्रिकेटर होईल.”

हेही वाचा: Arjun Tendulkar: सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?

ऑलिव्हर हा टेनिस चॅम्पियनचा नातू आहे

लेविट पुढे म्हणाला, “एका षटकात दुहेरी हॅट्ट्रिक मिळवणे आश्चर्यकारक तर आहेच पण अविश्वसनीय सुद्धा आहे. ही एक अप्रतिम कामगिरी त्याने केली असून मला असे वाटते की जोपर्यंत तो वयाने मोठा होत नाही तोपर्यंत त्याला त्याचे महत्त्व कळू शकणार नाही. विशेष म्हणजे, ऑलिव्हरची आजी १९६९ची विम्बल्डन टेनिस चॅम्पियन ‘अ‍ॅन जोन्स’ आहे.