Ollie Robinson vs Usman Khawaja: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने उस्मान ख्वाजाला बाद केले. १४१ धावांवर खेळत असलेला उस्मान ख्वाजा एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी क्लीन बोल्ड झाला. त्याची विकेट घेतल्यानंतर ओली रॉबिन्सन त्याच्यावर भडकला त्याचे ओरडतानाचे काही हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचे चाहत्यांनी ऑली रॉबिन्सनवर ख्वाजाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. यावर आता खुद्द रॉबिन्सने घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उस्मान ख्वाजाला इंग्लंडने पूर्ण नियोजन करून बाद केले. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने त्याच्यासाठी सहा क्षेत्ररक्षकांचे छत्रीच्या आकाराचे वर्तुळ बनवले, ज्यात ख्वाजा अडकला आणि बाद झाला. खरेतर, ते वर्तुळ तोडण्यासाठी शॉट खेळताना ख्वाजाने चुकीचा चेंडू निवडला आणि त्याचा ऑफ स्टंप उडाला. या सामन्यात ऑली रॉबिन्सनची ही पहिलीच विकेट होती.

रॉबिन्सनने ख्वाजाच्या बाबतीत घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने ख्वाजा बाद झाल्याचा आनंद उत्साहात साजरा केला. त्याच्या चेहऱ्यावर आक्रमकता दिसत होती. त्याच आक्रमकतेत त्याने ख्वाजाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली. रॉबिन्सनच्या या कृतीवर सोशल मीडियात टीका होत आहे. असे करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियन चाहते आणि माजी खेळाडूंची संख्या अधिक आहे. पण, आता रॉबिन्सनने या सर्वांविरुद्ध स्वतःचा बचाव केला आहे आणि तो खेळाचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. “मी कुठलाही अपशब्द वापरला नाही, भावनेच्या भरात हे सर्व होत असते. ख्वाजाने देखील ते मनात ठेवले नाही”, असे तो सामन्यानंतर म्हणाला.

प्रतिक्रियेमागे ख्वाजाची विकेट खास आहे – रॉबिन्सन

रॉबिन्सन पुढे म्हणाला, “घरच्या मैदानावरील ही माझी पहिली अ‍ॅशेस आहे आणि त्यादृष्टीने उस्मान ख्वाजाची विकेट माझ्यासाठी सामन्यातील पहिलीच नाही तर खासही होती.” त्याने ख्वाजाच्या फलंदाजीचेही कौतुक केले आणि अप्रतिम खेळी खेळल्याचे सांगितले. “तो ज्या पद्धतीने खेळत होता, त्याची विकेट घेणे ही आमच्या संघाची गरज बनली होती आणि मी तेच केले.” असेही तो म्हणाला.

हेही वाचा: ENG vs AUS: दोन्ही पायात वेगवेगळे बूट!  इंग्लिश खेळाडूचा मजेदार फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

जर तुम्ही अ‍ॅशेस खेळत असाल तर तुम्हाला हे खूप सहन करावे लागेल – रॉबिन्सन

स्वतःचा बचाव करताना रॉबिन्सनने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इतर कांगारू क्रिकेटपटूंचे उदाहरण दिले. तो म्हणाला, “आम्ही जे काही केले ते आमच्याबरोबरही करतात आणि यापुढेही होईल त्यामुळे मला त्याची पर्वा नाही. ही अ‍ॅशेस मालिका आहे आणि आम्ही व्यावसायिक खेळ खेळत आहोत, ज्यामध्ये खूप काही सहन करावे लागते, हे आपण विसरू नये.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olly robinson had to defend himself after taking the wicket of usman khawaja video went viral avw
Show comments