Olympic 2024 Table Tennis Star Manika Batra Makes History: भारताची अनुभवी खेळाडू मनिका बत्राने ऑलिम्पिक टेबल टेनिस स्पर्धेतील सर्वाेत्तम ३२ च्या सामन्यामध्ये फ्रान्सच्या १२व्या मानांकित प्रितिका पावडेचा सरळ गेममध्ये पराभव केला. राष्ट्रकुल चॅम्पियन आणि १८व्या मानांकित मनिकाने ३७ मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-९, ११-६, ११-९, १-७ असा विजय मिळवला. या विजसालह मनिका बत्राने ऐतिहासिक विजय मिळवत भारतासाठी ही कामगिरी करणारी पहिला भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू

Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Alcaraz, Sinner main attraction in Australian Open tennis tournament from today
अल्कराझ, सिन्नेर मुख्य आकर्षण; ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आजपासून
Indian cricket team to play warm up match in Dubai ahead of Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
Champions Trophy 2025 All Venues in Pakistan Lahore Rawalpindi Karachi Are Still Not Ready Tournament Could Shift to UAE
Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता

olympic 2024: मनिका बत्राने रचला इतिहास

ऑलिम्पिक टेबल टेनिसच्या सर्वाेत्तम १६ मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. मनिकाला पहिल्या गेममध्ये डावखुऱ्या खेळाडूशी जुळवून घेण्यात अडचण आली आणि हा सामना अगदी अटीतटीचा झाला. मनिकाने शेवटचे तीन गुण आपल्या नावे करत ११-९ ने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीलाही सामना खूपच बरोबरीत सुरू झाला, ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर मनिकाने प्रितिकाला कोणतीही संधी दिली नाही आणि तिने ११-६ ने विजय मिळवला. भारतीय खेळाडूने दुसऱ्या गेमची गती कायम ठेवली आणि तिसऱ्या गेममध्ये पाच गुणांची आघाडी घेतली परंतु प्रितिकाने सलग चार गुण मिळवत स्कोअर ९-१० असा केला.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 4: भारताला दुसरं ऑलिम्पिक पदक, मनू भाकेर-सरबज्योतच्या जोडीची कमाल

दबावाखाली खेळताना प्रितिकाने नेटवर चेंडू खेळला आणि मनिकाने हा गेम ११-९ असा जिंकला. मनिकाने चौथ्या गेममध्ये ६-२ अशी आघाडी घेत चांगली सुरूवात केली आणि सहा मॅच पॉइंट मिळवले. प्रितिकाला तीन मॅच पॉइंट वाचवण्यात यश आले आणि एक पॉईंट मिळवत तिने सामना जिंकला. उपउपांत्यपूर्व फेरीत मनिकाचा सामना आठव्या मानांकित जपानच्या हिरोनो मियू आणि हाँगकाँगच्या झू चेंगझू यांच्यातील विजेत्याशी होईल.

मनिका बत्राने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये पदके जिंकली होती. मनिकानेही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी करत पदक जिंकण्याच्या भारताच्या आशा उंचावल्या आहेत. मनिकाच्या शानदार विजयामुळे भारताच्या अव्वल मानांकित श्रीजा अकुला हिलाही प्रोत्साहन मिळेल आणि तिला बुधवारी विजयाची नोंद करून पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Story img Loader