Olympic 2024 Updates, Day 4: भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकेरने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्यो यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 4: भारताला दुसरं ऑलिम्पिक पदक, मनू भाकेर-सरबज्योतच्या जोडीची कमाल

South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ravindra Jadeja too go out If Varun Chakravarty Gets Picked Aakash Chopra on Champions Trophy 2025 Squad
Champions Trophy 2025 : ‘या’ फिरकीपटूमुळे रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून होणार बाहेर? माजी भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य
Sunil Gavaskar upset that he was Not called to hand over Border Gavaskar Trophy to Australia IND vs AUS
IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi's record during IND vs AUS Sydney Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

भारतीय स्टार जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. यापूर्वी कोणत्याच नेमबाजाने नेमबाजीत दोन पदके जिंकली नव्हती, मात्र मनूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अशाप्रकारे, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेर ही स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

हेही वाचा – Olympics 2024 : भारताच्या खात्यात दुसरं पदक, नेमबाजीत मनू भाकेर, सरबजोत सिंह जोडीची कमाल

Manu Bhaker एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. याआधी पॅरिस ऑलम्पिकच्या दुसऱ्या दिवशी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावले होते. मनू भाकेर गेल्या २० वर्षांत वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. यापूर्वी भारतीय महिला नेमबाज सुमा शिरूर होती, जिने २००४ मध्ये ग्रीक राजधानीत झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती.

हेही वाचा – Paris Olympics: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा जिंकलेला सामना ग्राह्य धरला जाणार नाही, BWF ने का घेतला असा निर्णय?

मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी
मनूपूर्वी भारतीय महिला नेमबाज सुमा शिरूरने अंतिम फेरी गाठली होती. २००४ मध्ये ग्रीसच्या राजधानीत झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. मनूला आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. ती १ ऑगस्ट रोजी महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेणार आहे.

Story img Loader