Olympic 2024 Updates, Day 4: भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकेरने मोठा इतिहास रचला आहे. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्यो यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in