वृत्तसंस्था, हेलसिंकी : भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर शनिवारी पहिले जेतेपद पटकावले. फिनलंड येथे सुरू असलेल्या क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक कमावले. या निमित्ताने विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला चार दिवसांत त्याने दोनदा मागे टाकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या माजी ऑलिम्पिक विजेत्या केशॉर्न वॉलकॉट (८६.६४ मीटर) आणि ग्रनाडाच्या पीटर्स (८४.७४ मीटर) यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या पाव्हो नूर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने ८९.३० मीटर अंतरावर भाला फेकून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडित काढला होता. याआधी नीरजच्या नावावर ८८.०७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम होता. ऑलिम्पिमध्ये त्याने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून जेतेपद मिळवले होते. त्यामुळे या स्पर्धेत नीरज ९० मीटरचा टप्पा ओलांडेल, याकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष होते. पोव्हो नूर्मी स्पर्धा फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरने ८९.८३ मीटर अंतरासह जिकली होती.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटर अंतर गाठले. जे अन्य स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी पुरेसे ठरले. त्यानंतर दुसरा आणि तिसरा प्रयत्न त्याचा चुकीचा ठरला. उर्वरित तीन प्रयत्न त्याने टाळले. या दोन स्पर्धामधील कामगिरीमुळे स्टॉकहोम येथे ३० जूनला होणाऱ्या डायमंड लीगबाबत त्याच्या आशा उंचावल्या आहेत.