Vinesh Phogat Disqualified Olympics 2024 : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण भारतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून क्रीडापटू, राजकारणी, सेलब्रिटी, सामान्य लोक आपला रोष आणि दुःख व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही विनेश फोगटला पाठिंबा मिळत आहे. ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र आता अपात्र झाल्यामुळे तिला मोकळ्या हाताने पॅरिस ऑलिम्पिकमधून परतावे लागणार आहे. यावर आता माजी बॅडमिंटनपटू आणि भाजपा नेत्या सायना नेहवालनेही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढच्या वेळी पदकासाठी प्रयत्न करावा

सायना नेहवालने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले की, विनेश फोगटच्या अपात्रप्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून मी तिच्या विजयाची कामना करत होते. या क्षणासाठी प्रत्येक खेळाडूला तयार करण्यात येत असते. याक्षणी काय भावना असतात, हे मी समजू शकते. एका खेळाडूसाठी हे शब्दात न सांगता येणारे आहे. कदाचित वजन अचानक वाढले असेल. ती योद्धा आहे आणि यावर ती नक्कीच मात करेल. पुढच्या वेळी पदक मिळेल, याचा तिने नक्कीच प्रयत्न करावा.

Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?

हे वाचा >> Vinesh Phogat Disqualification: “विनेश फोगटला जे जे हवं होतं ते सगळं…”, केंद्रीय क्रीडामंत्र्यांचं लोकसभेत निवेदन; म्हणाले, “तिथे रोज सकाळी…”

कुठेतरी चूक झाली

“विनेश अनुभवी कुस्तीपटू आहे. तिला बरोबर आणि चूक आहे. मला कुस्तीबद्दल फारसे कळत नाही. तिने नक्की काय चूक केली आणि तेही शेवटच्या दिवशी, याबद्दलही माझ्याकडे माहिती नाही. मी तिला नेहमीच प्रचंड मेहनत करताना पाहिले आहे. तिने तिचे १०० टक्के दिलं. पण अशा मोठ्या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी चूक होत नाही. हे कसे झाले, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. विनेशसाठी मोठी टीम होती. प्रशिक्षक, फिजियो, ट्रेनर्स असतानाही, असे घडले. त्यामुळे त्यांनाही वाईट वाटत असेलच. मला कुस्तीचे नियम माहीत नसले तरी एक खेळाडू म्हणून वाईट वाटत आहे”, असेही विधान सायना नेहवाल यांनी केले.

सायना नेहवालने भारताला ऑलिम्पिकमध्ये बॅटमिंटनसाठी पहिले पदक मिळवून दिले होते. तसेच २०२० साली तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता.

हे ही वाचा >> Paris Olympic 2024 Live, Day 12: विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये ठरली अपात्र, चानू-अविनाशकडून भारताला पदकाची अपेक्षा

विनेशकडूनही काहीतरी चुकलं असावं

सायना नेहवाल एनडीटीव्हीशी बोलताना पुढे म्हणाली, “विनेशची ही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा नव्हती. ती तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. एक खेळाडू म्हणून तिला सर्व नियम माहीत आहेत. पण नक्की काहीतरी चूक झाली आहे. दुसऱ्या कुणाही खेळाडूबरोबर असे झालेले मी कधी ऐकलं नाही. वजन वाढल्यामुळे अपात्र ठरल्याचे आजवर माझ्यातरी ऐकिवात नाही. ती अनुभवी खेळाडू आहे, तरीही विनेशच्या बाजूनंही काहीतरी चुकलं असावं. तिनं याचा दोष स्वीकारला पाहीजे. एवढ्या मोठ्या सामन्याआधी अशा चुका करणं योग्य नाही.”

मंगळवारी तीन मोठे विजय

मंगळवारी (६ ऑगस्ट) विनेश फोगटने तीन सामन्यात विजय मिळविला होता. २९ वर्षीय विनेश फोगटचे आधीच्या तीनही सामन्यात वजन ५० किलोच्या आत होते. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले होते. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पालटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला.

Japan’s Yui Susaki and India’s Vinesh Phogat
पॅरीस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जपानच्या युई सुसाकीचा पराभव करताना विनेश फोगाट

आणखी वाचा >> Vinesh Phogat : व्यायाम केला, केस कापले, रक्त काढलं तरीही.., विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी केले ‘हे’ प्रयत्न

आपल्या कारकिर्दीतले तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या विनेशने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि शेवटच्या पाच सेकंदात जपानच्या चॅम्पियन कुस्तीपटूला नमवून दोन गुण मिळवण्यात यश मिळवले. जपान संघानेही या विरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला, त्यामुळे विनेशला आणखी एक गुण मिळाला आणि तिने ३-२ असा विजय मिळवला. यानंतर युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. लिवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने (Vinesh Phogat) आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवला. विनेशने उपांत्यपूर्व सामना ७-५ च्या फरकाने जिंकला.

Story img Loader