इंडोनेशियाचा माजी विश्वविजेता बॅडमिंटनपटू तौफिक हिदायत निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. घरच्या मैदानावर होणारी इंडोनेशियन खुली बॅडमिंटन स्पर्धा तौफिकची कारकीर्दीतील शेवटची स्पर्धा असणार आहे. २००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये तौफिकने इंडोनेशियाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. तौफिकने सहावेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. वेगवान मात्र तरीही सहज आणि शैलीदार खेळासाठी तौफिक ओळखला जातो. मात्र यावर्षी जेतेपदावर कब्जा करणे तौफिकसाठी सोपे असणार नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मलेशियाचा ली चोंग वेई आणि दुसऱ्या स्थानी असलेला चीनचा चेन लाँग सहभागी होत आहेत. यामुळे जेतेपद मिळवणे तौफिकसाठी खडतर असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा