भारताला अपंगांच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून देणाऱ्या गिरीशा होसनगारा नागराजेगौडा याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पाळले गेलेले नाही. तो अद्यापही बेकारच आहे.
लंडन येथील पॅराऑलिम्पिकमध्ये उंच उडीत रौप्यपदक मिळविल्यानंतर गिरीशा याला तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी शासकीय आस्थापनात प्रथमश्रेणी अधिकाऱ्याची नोकरी देण्याचे जाहीर केले होते. माकन यांचे खातेही बदलले. गिरीशा याने आजपर्यंत अनेक वेळा पत्र लिहूनही त्याला अद्याप नोकरी मिळालेली नाही. त्याने सांगितले, ‘‘माझ्या घरची स्थिती बेताचीच असून सर्वजण माझ्या नोकरीवर अवलंबून आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी केंद्रीय क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरण यांना पत्र पाठविले होते. तसेच अनेक वेळा स्मरणपत्रेही पाठविली, मात्र माझ्या अर्जाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. नवीन क्रीडामंत्री जितेंद्रसिंग व साईच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही मी भेटलो. तथापि, माझ्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा