२०२० साली टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चीत करण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय महिला हॉकी संघाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी अमेरिकेचा ५-१ ने धुव्वा उडवला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध खेळ केला. मात्र २८ व्या मिनीटावर भारताच्या लिलिमा मिन्झने गोलकोंडी फोडत पहिला गोल झळकावला. यानंतर भारतीय महिलांनी सामन्यात मागे वळून पाहिलच नाही. शर्मिला, गुरजित कौर आणि नवनीतने गोलचा धडाका लावत भारताची बाजू वरचढ केली. अमेरिकेकडून एरिनने ५४ व्या मिनीटाला एकमेव गोल झळकावला, मात्र तोपर्यंत भारतीय महिलांनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली होती.

Story img Loader