जिनिव्हा : पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यास रोख ५० हजार डॉलरचे पारितोषिक देण्याच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या निर्णयास अन्य देशांच्या ऑलिम्पिक संघटनांकडून विरोध होत आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी गेल्याच आठवडयात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कधीच रोख पारितोषिक देत नाही. खेळाडूंना त्यांच्या देश आणि राज्याकडून रोख पारितोषिके दिली जातात. अर्थात, असा निर्णय प्रत्येक देश किंवा राज्य घेत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे को म्हणाले होते.

हेही वाचा >>> IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय

lon Musk Ambani government role in allocating spectrum for SATCOM print eco news amy 95
‘सॅटकॉम’साठी स्पेक्ट्रम वाटपाच्या सरकारच्या भूमिकेने अंबानींविरोधात मस्क यांना झुकते माप
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
Tensions in Goa after ex RSS leader Subhash Velingkar communal remark
Tensions in Goa: संघाच्या माजी नेत्यामुळं गोव्यात तणाव; ख्रिश्चन समुदायाकडून आंदोलन तर राहुल गांधींची भाजपावर टीका
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
IPL 2025 Dwayne Bravo appointed as new KKR mentor replaces Gautam Gambhir
IPL 2025: गौतम गंभीरच्या जागी धोनीचा खास मित्र, KKRचा मोठा निर्णय
Supreme Court Questions on Baijuj Case Verdict print eco news
बैजूज प्रकरणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?

जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या या निर्णयाला विरोध वाढत आहे. हा निर्णय ऑलिम्पिक चळवळ आणि तत्त्वांना मुरड घालणारा आहे, असे उन्हाळी ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय महासंघाने (एएसओआयएफ) म्हटले आहे. ‘आयओसी’चे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाख यांचा १२ वर्षांचा कालावधी पुढील वर्षी संपत आहे. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सेबॅस्टियन को यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळेच त्यांनी ही घोषणा केली असा मतप्रवाह आहे. आता को यांना रोखण्यासाठी ऑलिम्पिक चळवळीत बदल करून वयाची अट शिथिल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खेळाडूंमुळे ऑलिम्पिकला इतके महत्त्व प्राप्त होते. त्यांच्यामुळेच स्पर्धा यशस्वी आणि लोकप्रिय होत असते. त्यामुळे ‘आयओसी’कडून जागतिक अ‍ॅथलेटिक्सला मिळणाऱ्या महसुलामधूनच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत, असे को यांनी म्हटले आहे. मात्र, ‘एएसओआयएफ’ने या विचाराने ऑलिम्पिकची परंपरा मोडीत निघण्याची भीती व्यक्त केली आहे. ‘आयओसी’कडून मिळणारा निधी हा खेळाच्या विकास आणि प्रसारासाठीच वापरण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे.