ऑलिम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूंवर त्यांच्या राज्यांमधील सरकारांनी बक्षिसांचा वर्षाव केलाय. भालाफेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर तर कोट्यावधींच्या बक्षिसांचा वर्षाव झालाय. त्याचप्रमाणे पंजाब, हरयाणा सरकारने हॉकी संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंना बक्षिसांची घोषणा केलीय. दुसरीकडे बॉक्सिंग आणि वेटलिफ्टींगमध्ये पदक मिळवणाऱ्या महिला खेळाडूंनाही ईशान्य भारतातील राज्यांनी बक्षिसांची घोषणा केली असली तरी भारतातील एका पदक विजेत्या खेळाडूला बक्षिस म्हणून चक्क एक शर्ट, धोतर आणि एक हजार रुपये मिळणार आहेत. काय गोंधळून गेलात ना? पण हे खरं आहे. असा अनोखा सत्कार केला जाणार आहे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश.
नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?
भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये संपवत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. भारतीय हॉकी संघाच्या या विजयामध्ये गोलपोस्टवर एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहून विरोधी संघाची आक्रमणे परतवून लावणारा गोलकीपर पी. आर. श्रीजेशचं त्याच्या कामगिरीसाठी सर्वच स्तरामधून कौतुक झालं. अनेकांनी तर सोशल नेटवर्किंगवर श्रीजेशला ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणत त्याचं कौतुक केलं. परात्तू रविंद्रन श्रीजेशचा जन्म केरळमधील एर्नाकुलममधील किझाककामबल्लम या गावी झाला असून वयाच्या १२ व्या वर्षी त्याने जीव्ही राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये जाण्यास सुरुवात केली. हॉकीमध्ये करियर करण्याचं त्याने निश्चित केलं नव्हतं. मात्र त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला तू गोलकिपर म्हणून छान कामगिरी करशील असं सांगितलं. २०२१ साली त्याच्या गोलकिपींगच्या कौशल्यामुळेच ऑलिम्पिक हॉकी संघात संधी मिळाली ज्याचं त्याने सोनं करुन दाखवलं.
नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”
मात्र श्रीजेशच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी केरळमधील हातमाग विभागाने शनिवारी एका विशेष सप्राइजची घोषणा केली. मल्याळम भाषेतील जन्मभूमी या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार केरळ हातमाग विभाग श्रीजेशचा सत्कार म्हणून त्याला धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये देऊन गौरवणार आहे.
नक्की वाचा >> २४ वर्षीय ऑलिम्पिक सायकलपटूचा आकस्मिक मृत्यू; तिची शेवटची Instagram पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
View this post on Instagram
एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे श्रीजेशचा अशा साध्या पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे. श्रीजेशला देण्यात येणारा हा पुरस्कार फारच वेगळा असून यावरुन केरळ सरकारला ट्रोल केलं जात आहे. एकाने पाच किलो तांदूळच दिले असते असा टोला लगावला आहे तर एकाने या मोबदल्यात ते पैसे मागणार नाही अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे.
नक्की पाहा >> “फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय”; Viral झाला मोदींच्या आवाजातील श्याम रंगीलाचा व्हिडीओ
नक्की पाहा >> Viral Video : नीरज चोप्रा नाही तर ‘या व्यक्तीने मिळवून दिलंय भालाफेकमध्ये पहिलं मेडल’
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी श्रीजेशसाठी कोणत्याही विशेष पुरस्कारीच घोषणा केलेली नाही. या उलट श्रीजेशचे हॉकी संघात खेळणाऱ्या पंजाब आणि हरयाणातील खेळाडूंना त्यांच्या राज्यांनी मोठी रक्कम बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केलीय.