Olympics 2024 Results: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज म्हणजेच २५ जुलैपासून भारताच्या खेळांना सुरूवात झाली आहे. आज महिला तिरंदाजी स्पर्धेची रँकिंग फेरी पार पडली. भारताकडून तीन तिरंदाजांनी यात सहभाग घेतला पण कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारतीय तिरंदाजांमध्ये माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिका कुमारीकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या पण ती मागे पडली. मात्र, ही सांघिक स्पर्धा होती आणि असं असताना भारताच्या या तिन्ही महिला तिरंदाजांनी एकूण कामगिरी चांगली करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 च्या पदकांचं आयफेल टॉवरशी खास कनेक्शन, ‘अशी’ तयार केली यंदाची पदकं

INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?
IND vs AUS 2nd Test India Playing XI and Toss Update Rohit Sharma to bat at no 6
IND vs AUS 2nd Test: ठरलं! रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर फलंदाजीला उतरणार, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम

दीपिका कुमारी व्यतिरिक्त भारताकडून अंकिता भगत आणि भजन कौर सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ६४ तिरंदाजांचा सहभाग होता. अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार होता आणि टीम इंडियाने चौथ्या स्थानी येत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

Paris Olympics 2024: महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

रँकिंग फेरीत दीपिका, भजन आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत एकूण १९८३ गुण मिळवले आणि पहिल्या चारमध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले. भारताशिवाय दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोचे संघही पहिल्या चारमध्ये आहेत. कोरियाच्या महिला संघाने २०४६ गुण, चीनने १९९६ गुण आणि मेक्सिकोच्या संघाने १९८६ गुण मिळवले आणि हे तिन्ही संघ भारतापेक्षा पुढे होते.

हेही वाचा – Paris 2024 Olympics Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने?

भारतीय तिरंदाजांच्या वैयक्तिक गुणांमध्ये अंकिता भक्त सर्वात अचूक होती. तिने अचूक तिरंदाजी करत एकूण ६६६ गुण मिळवले आणि ती ११व्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या खालोखाल भजन कौर हिने ६५९ गुणांसह २२ वे स्थान पटकावले. दीपिका कुमारी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही आणि ती ६५८ गुणांसह २३व्या स्थानावर राहिली.

हेही वाचा – Paris Olympics 2024 सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात, अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर चाहत्यांनी फेकल्या बॉटल, मेस्सीची प्रतिक्रिया व्हायरल

Olympics 2024: महिला तिरंदाजीतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने

दक्षिण कोरिया वि. यूएसए/चिनी तैपेई

चीन वि. इंडोनेशिया/मलेशिया

मेक्सिको वि. जर्मनी/ग्रेट ब्रिटन

भारत वि. फ्रान्स/नेदरलँड

Story img Loader