Paris Olympics 2024 Medal Tally: पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त खेळ पाहायला मिळत आहेत. सर्वच देशांतील खेळाडू एकमेकांना तगडी टक्कर देत पदके जिंकून आपल्या देशाला गौरव मिळवून देण्याच्या प्रयत्नात करत आहेत. दरम्यान, आतापर्यंत तीन दिवसांचे खेळ झाले आहेत. तर चौथ्या दिवशीही अनेक देशांनी पदक पटकावले आहेत. या तीन दिवसांत आणि ३० जुलै संध्याकाळी ७ पर्यंत कोणत्या देशाने किती पदके जिंकली आहेत, हेही जाणून जाणून घेऊया.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 4: भारताचा हॉकी सामन्यात दणदणीत विजय, सात्त्विक-चिरागचा दबदबा कायम; तिरंदाज भजन कौर पुढील फेरीत

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Border Gavaskar Trophy 2024 Ind vs AUS Schedule in Marathi
Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

पदकतालिकेत चीन आणि जपान हे देश अव्वल स्थानी आहेत. ऑलिम्पिकचे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर पदकतालिकेत जपान पहिल्या क्रमांकावर आहे. जपानने आतापर्यंत एकूण १२ पदके जिंकली असून त्यात ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर यजमान देश फ्रान्स दुसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्सने आतापर्यंत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली आहेत. म्हणजेच त्याच्या नावे एकूण १६ पदके आहेत. जपानकडे ६ सुवर्ण असल्याने ते पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. चीनबद्दल बोलायचे तर चीनने आतापर्यंत ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली आहेत. त्यांच्या एकूण पदकांची संख्या १२ पर्यंत आहे.

हेही वाचा – Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू

तर चौथ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गुणतालिका पाहता चीनने बाजी मारली आहे. चीनने चौथ्या दिवशी सुवर्ण पदक जिंकत गुणतालिकेत झेप घेतली आहे. तर जपान १२ पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे. फ्रान्सचा संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, सर्वाधिक मेडल असले तरी संघाकडे केवळ ५ सुवर्ण पदके आहेत. चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया ५ सुवर्ण, ४ रौप्य यासह ९ पदके आहेत. पाचव्या स्थानी रिपब्लिक ऑफ कोरिया असून ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांसह एकूण १० पदके आहेत. तर अमेरिकाचा संघ सर्वाधिक २० पदकांसह सहाव्या स्थानी आहे. अमेरिकेने सर्वाधिक रौप्य (८) व कांस्य (९) पदके जिंकली आहेत आणि ३ सुवर्ण पदके आतापर्यंत जिंकली आहेत.

हेही वाचा – Olympic 2024: टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा ऐतिहासिक विजय, ऑलिम्पिकमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

Medal tally Olympics 2024

Medal tally Olympics 2024: भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या तुलनेत भारतीय संघ २ कांस्य पदकांसह २८व्या स्थानी आहे. भारताने ही दोन्ही पदके नेमबाजीत पटकावली आहेत. पहिले पदक मनू भाकेर या २२ वर्षीय नेमबाज महिला १० मी एअर पिस्तुल प्रकारात जिंकले. तर दुसरे कांस्य पदक मिक्स्ड १० मी एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी पटकावले आहे. यासह मनू भाकेर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू आहे.

वरील सर्व देशाच्या पदकांची संख्या ही ३० जुलै संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आहे.